लोकसत्ता वार्ताहर

वाई: देशाची परिस्थिती बिकट नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केले असते तर बिकट परिस्थिती त्यांची झाली नसती, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात व्यक्त केले. खासदार उदयनराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जलमंदिर पॅलेस येथे आले होते. येथे त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. राजमातांचे आर्शिवाद घेतले. खासदार उदयनराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.

उदयनराजेंना शुभेच्छा द्यायला साताऱ्यात आलो याचा मला आनंद आहे. त्यांचे आणि माझे संबंध भावासारखे आहेत. आमची मैत्री आहे. त्यामुळे निश्चितच राजवाडयात येवून त्यांचा सत्कार करणे ही माझी मनापासून इच्छा होती. ती आज पूर्ण करता आली आणि आईसाहेबांचा आर्शिवाद मला घेता आला, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-मनोज जरांगेंच्या ‘एन्काऊंटर’च्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य; म्हणाले, “पोलिसांना योग्य…”

देशाची परिस्थिती बिकट आहे, असा आरोप पवार यांचा आहे यावर त्यांनी वरील उत्तर दिले. शरद पवार रायगडावर गेले. त्याचे खरे श्रेय अजित पवारांना दिले पाहिजे. त्यांनी पवार रायगडावर चाळीस वर्षानंतर पाठवले. चाळीस वर्षानंतर पवार छत्रपती शिवरायांच्या चरणी लिन झाले. याचा मला मनस्वी आनंद होत आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

भाजपाची साताऱ्यात उमेदवारी उदयनराजेंना मिळणार काय असे विचारले असता ते म्हणाले, भाजपामध्ये एक प्रक्रिया असते. पहिल्यांदा जागा वाटप करणार आहोत. इतर पक्षाप्रमाणे बीजेपीमध्ये कधीही अशी घोषणा होत नाही, असे सांगत चर्चा अनेक असतात. माध्यमांमध्ये जास्त असतात, असे उत्तर देत ते म्हणाले, खासदार उदयनराजे आणि माझे संबंध वेगळे आहेत. त्यांच्यासोबत मी नेहमीच आहे. महायुतीत बसून कोणी कुठल्या जागा लढायचे हे अजून ठरायचे आहे. चर्चेची प्राथमिक फेरी झाली आहे. बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले आहेत. अजून एक दोन फेऱ्या कराव्या लागतील. त्यानंतर सर्व प्रश्न ठीक होईल. त्यानंतर कोणी कुठल्या जागा लढवायच्या हे ठरले की मी तुम्हाला सांगेन, माझ्यासारख्या नेत्याने अटकलबाजी करणे किंवा त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणे त्या लेव्हलचा मी नाही. त्यामुळे योग्य वेळी सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा, मराठा आक्षणावर बोलताना म्हणाले; “आपण काय बोलतोय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बच्चूकडू शिवसेनेसोबत आहेत. कधी कोणाच्या मनासारखे झाले नाही. ईव्हीएमच्या प्रश्नावर म्हणाले, ईव्हीएमबाबत जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली असते आणि हारतात तेव्हा ती खराब असते. इलेक्शन कमिनशनने सगळ्या पक्षांना ओपन चॅलेंज दिले होते. ज्यांच्या जवळ ईव्हीएम मशिन टेंपरिंग करण्याचे तंत्रज्ञान असेल त्यांनी आम्हाला करुन दाखवावे, एकही पक्ष देशातला करु शकलेला नाही. सुप्रिम कोर्टाने देखील त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हारायची मानसिकता झाली की ईव्हीएम आठवते, असा टोला ईव्हीएम मशिनला विरोध करणाऱ्यांना त्यांनी लगावला.भाजपा सगळयांना घेवून चालते. कधी कोणाला त्यांच्या मनासारखे झाले नाही. ते आम्हाला शिव्या देतात. आम्ही मोठे आहोत. आम्ही ऐकून घेतो, असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले