scorecardresearch

राज्यभरात पावसाची चाहूल, खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये तैनात

ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून पोहोचेल.

uddhav thackeray rain meeting
एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये अगोदरच तैनात करण्यात आल्या आहेत.

सध्या देशभरात पावसाळ्याची चाहूल लागली आहे. तर मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढताना दिसतोय. त्यामुळे ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली.

हेही वाचा >> अविनाश भोसले यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ८ जूनपर्यंत CBI कोठडी

ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून पोहोचेल. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे १५ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल.

हेही वाचा >> हनुमान जन्मस्थळाचा वाद विकोपाला; तोडगा काढण्यासाठी महंत भेटले आणि तिथेही एकमेकांना भिडले

तसेच पावसाळ्यात धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. जलसंपदा विभागाचे अधिकारी पूर नियंत्रण नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा >> मुख्यमंत्रीपदावरुन सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांमध्ये तू तू मैं मैं सुरु असतानाच भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बहुदा उद्धव ठाकरे…”

पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे धरण क्षेत्रातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून १५ जूनपासून लाईव्ह पाहू शकतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2022 at 19:48 IST

संबंधित बातम्या