बीड : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी बीड बस यांचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.या रेल्वेसाठी बीड वासियांना उद्घाटनापासून 30 वर्ष इतका कालावधी थांबाव लागलं.या कालावधीत अनेक खासदारांनी पदे भूषविली.विद्यमान खा.सोनवणे जरी या रेल्वेचे श्रेय घेऊ पाहत असले तरी बीड – अहिल्यानगर रेल्वेसाठी निधी खेचून आणण्यात मोठा वाटा हा मुंडे कुटुंबियांचा राहिलेला आहे.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी या रेल्वेसाठी विरोधी पक्षाचे खासदार असताना ४५० कोटी रुपयांवचा निधी मिळवला होता.
बीड – अहिल्यानगर रेल्वेसाठी आपल्या वडीलांच्या पाऊलांवर पाऊल टाकत या रेल्वेसाठी निधी आणणाऱ्या माजी खा.प्रीतम मुंडे यांनी मात्र या रेल्वे उद्घाटनाबाबत मौन राहणेच पसंद केल्याचे दिसून आले. अलीकडच्या काळात समाज माध्यमांवर कार्यकर्त्यांसह नेतेही मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेले दिसून येतात.खा प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात म्हणजेच २०१४ ते २०२४ दरम्यान बीड – अहिल्यानगर रेल्वेसाठी २१०८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळवून दिला होता.याव्यतिरिक्त याच काळात राज्य सरकारने देखील त्यांच्या वाट्याचा समान निधी रेल्वेसाठी दिला.असे असतानाही याचे श्रेय प्रीतम मुंडेंनी घेतल्याचे पाहायला मिळाले नाही.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड – अहिल्यानगर रेल्वेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,खा.बजरंग सोनवणे, राज्यसभेच्या खा.रजनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.मंचावरून या रेल्वेबाबत श्रेय घेण्याची स्पर्धा दिसून आली होती.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात रेल्वे ही श्रेय घेण्याचा विषय नसल्याचे आवर्जून सांगितले होते.तर अजित पवार यांनी दिवंगत केशर काकू क्षीरसागर पासून ते बजरंग सोनवणे पर्यंत सर्व खासदारांचे नाव घेत ही रेल्वे पुढे जात असल्याचे सांगितले. यावेळी आपल्या भाषणातून मंत्री पंकजा मुंडेंनी खा.सोनवणे यांच्यावर प्रत्यक्ष – प्रत्यक्ष टीका केल्याचे दिसून आले.मात्र या सर्व श्रेय वादापासून माजी खासदार प्रीतम मुंडे या दूरच राहिल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात त्यांच्याच काळात या रेल्वेसाठी दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी मिळाला होता हे विसरून चालणार नाही.