आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. धर्म लपवून एका मागासवर्गीयाचा अधिकार हिसकावून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दरम्यान जात पडताळणी समितीच्या या निर्णयानंतर समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी न्यायपालिका, जात पडताळणी समिती तसेच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो, मला त्रास देण्यासाठी हा आरोप करण्यात आला होता, असे वानखेडे म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >> “खासदारकी रावसाहेब दानवेच्या बापाची आहे का?” अर्जुन खोतकरांसाठी जागा सोडणार का विचारताच दानवेंनी दिले थेट उत्तर

“जात पडताळणी समितीने माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली आहे. तसेच याबाबत आदेशपत्रही काढले आहे. आपली न्यायपालिका, जात पडताळणी समिती तसेच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. हे सर्व आम्हाला त्रास देण्यासाठी करण्यात आले होते. ते आता सर्व समोर आले आहे,” अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली.

हेही वाचा >> मुंबईनंतर आता औरंगाबादेतही शिंदे गटाकडून उभारले जाणार कार्यालय, जागेचा शोध सुरू!

“माझ्या दिवंगत आईवर, ७७ वर्षांच्या वडिलांवर, बहीण तसेच माझ्या पत्नीवर खालच्या पातळीवरील आरोप करण्यात आले. माझ्या आयुष्यात मी हे पहिल्यांदाच पाहिले. भारतात हा प्रसंग कुठेही घडला नव्हता. देशसेवा केल्यामुळे माझ्यावर आरोप करण्यात आले होते. मी आयआरएस ऑफिसर आहे. आरोपांना सामोरे जाण्यासाठी मला ट्रेन करण्यात आलं आहे. मात्र माझ्या कुटुंबीयांना फार त्रास झाला,” असेदेखील वानखेडे म्हणाले.

हेही वाचा >> नवाब मलिकांनी केलेल्या ‘त्या’ आरोपाप्रकरणी समीर वानखेडेंना क्लीनचिट; जन्माने मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट दिलेली आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांनी केला होता. आर्यन खानला मिळालेल्या क्लीनचिटवर अधिक भाष्य करण्याचे वानखेडे यांनी टाळले. “माझ्या जात आणि धर्मावरदेखील अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र आता सत्य समोर आले आहे. मी सध्या शासकीय सेवेत आहे. त्यामुळे या प्रकरणावर टिप्पणी करणे नियमांच्या विरोधात जाण्यासारखे होईल. त्यामुळे मी यावर जास्त बोलणार नाही. एनसीबीमधील माझ्या कार्यकाळाबद्दल मी बोलू शकत नाही,” असेदेखील समीर वानखेडे म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “मी अजिबात नाराज नाही, पण…”, मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!

जात पडताळणी समितीने काय निर्वाळा दिला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जात पडताळणी समितीने समीर वानखेडे हे जन्मत: मुस्लीम नसल्याचे म्हणत त्यांना क्लीन चिट दिली. जात पडताळणी समितीने ९१ पानांचे आदेशपत्र काढले आहे. यामध्ये समितीने समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र कायम ठेवले आहे. समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारला नसल्याचे म्हणत ते अनुसूचित जाती (महार-३७) प्रवर्गातील असल्याचे या समितीने सांगितले आहे.