सांगली : मिरजेतून आटपाडीला होणारी अवैध मद्य वाहतूक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी उघडकीस आणून १२ लाखाचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. ही माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांचे पथकामधील कर्मचाऱ्यांना अवैध मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा येथे पथक देखरेख करीत होते. यावेळी संशयास्पद टेम्पो (एम.एच. १० डी टी ७२०५) अडवून झडती घेण्यात आली असता विदेशी मद्याचा अवैध साठा वाहनात आढळून आला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ५ लाखाचे वाहनसुद्धा जप्त केले आहे.