ठाकरे गटातील नेते अनिल परब यांचे मुंबईतील कार्यालय तोडण्यात आले. या कारवाईनंतर येथे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. याच कारवाईवर तसेच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत. किरीट सोमय्या हलकट माणूस आहे, असे संजय राऊत म्हणाले. ते आज (१ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> मशिदीतील बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानी मंत्र्याचे विधान; म्हणाले, “भारतातही भाविक मारले गेले नाहीत, पण…”

मुलूंड येथील एक पोपटलाल वारंवार आरोप करतो

“शिवसेना यापुढे राडा करणार आहे. आमच्यावर खोटे गुन्हे नोंदवले जात असतील तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत. अनिल परब यांच्या कार्यालयावर हतोडा टाकण्यात आला. मुळात ते कार्यालय परब यांचे नव्हते, हे म्हाडाने सांगितले आहे. तरीदेखील भाजपाचा मुलूंड येथील एक पोपटलाल वारंवार कधी अनिल परब कधी संजय राऊत कधी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करतो. या बदनामीच्या मोहिमांना आता आम्ही थांबवणार आहोत,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्र, मुंबईसाठी विशेष तरतूद करा,’ संजय राऊतांची केंद्राकडे मागणी; म्हणाले, “हा पैसा भाजपाचा नव्हे, तर…”

किरीट सोमय्या तसेच नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस दिली

“तुमच्यात हिंमत असेल तर भाजपा पुरस्कृत उद्योगपतीने देशाला खड्ड्यात घातले आहे, यावर बोलावे. हा आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार आहे. शेकडो शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यावर पोपटलाल का बोलत नाहीत. काल शिवसेनेने जो राडा केला, त्याचे मी स्वागत करतो. खोट्या कारवाया केल्या जात असतील तर आम्ही कायदेशीर लढाई लढू. मी स्वत: किरीट सोमय्या तसेच नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी आमच्यावर केलेले आरोप कोर्टात सिद्ध करावे लागतील,” असे आव्हान राऊत यांनी दिले.

हेही वाचा >>> Video : अथिया शेट्टीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं चाहत्यांचं लक्ष, व्हिडीओत दिसली झलक

किरीट सोमय्या हलकट माणूस- संजय राऊत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही लवकरच मुंबई पालिकेचा घोटाळा बाहेर काढू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “किरीट सोमय्या हलकट माणूस आहे. अगोदर त्यांनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या प्रमुखांची भेट घ्यावी. देश आर्थिक संकटात गेला आहे. एलआयसी, गरिबांचे पैसे लुटण्यात आले आहेत. आम्ही तिकिटाचे पैसे देतो, त्यांनी अमेरिकेत जाऊन याची माहिती घ्यावी. हिंमत आहे का? पोपटलालची पोपटपंची आम्ही बंद करू,” असेही संजय राऊत म्हणाले.