सांगली : मागील हंगामातील उसाला प्रतिटन ४०० रूपये द्यावेत या मागणीसाठी गुरूवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनआक्रोश पदयात्रेचा सुरूवात झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

गत हंगामातील साखरेला चांगला दर मिळाला आहे, तसेच इथेनॉलपासून चांगले उत्पन्न कारखान्यांना मिळाले आहे. मात्र, कारखानदारांनी केवळ एफआरपीनुसार देयके अदा केली आहेत. अतिरियत उत्पन्नातील वाटा म्हणून प्रतिटन ४०० रूपये शेतकर्‍यांना मिळावेत, त्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही असा इशारा यावेळी श्री. शेट्टी यांनी दिला.

हेही वाचा >>>मुंबईत मराठा समाजाचं गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत आंदोलन, मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जन आक्रोश यात्रेचा प्रारंभ सांगलीतून झाला असून ही पदयात्रा विविध कारखान्यावर जाउन आपली मागणी कारखानदारांना सांगणार आहे. 22 दिवस ६०० किलोमीटर अंतर ही पदयात्रा असून १ नोव्हेंबर रोजी कुंडल येथे कोल्हापूर येथून निघालेल्या जनआक्रोश यात्रेचा मिलाफ होणार आहे. या दरम्यान, सांगलीतील जनआक्रोश पदयात्रा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आरग, कवठेमहांकाळ, उदगिरी, सोनहिरा, तासगाव, विटा या कारखान्यावरून कुंडल येथे येणार असून याच दरम्यान दत्त कारखाना येथून निघालेली शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्राही कुंडल येथे येणार आहे. दोन्ही पदयात्रा एकत्रित येउन क्रांती, हुतात्मा आणि राजारामबापू कारखान्यावर जाणार आहेत. या पदयात्रेची सांगता 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील उस परिषदेत होणार आहे.