लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी,
अलिबाग- ज्वेलर्सच्या दुकानात हातचालाखी करून चोरी करण्यात तिचा हातखंडा होता. यापुर्वीही एकदा तिने अलिबागमध्ये येऊन ज्वेलर्समधून सोनसाखळी पळवली होती. दुसऱ्यांदा चोरीसाठी ती अलिबागमध्ये दाखल झाली होती. पण अलिबाग पोलीसांनी तीला रंगेहाथ पकडून अटक केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोने खरेदीसाठी नागरीकांची गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेण्यासाठी ही महिला अलिबागमध्ये दाखल झाली होती. तीने महावीर चौकात असलेल्या श्री ज्वेलर्स दुकानात सोन्याची चेन दाखवण्यास सांगितले. यानंतर दुकान मालक आणि कामगार यांची नजर चुकवून एक सोन्याची चेन घेऊन निघून गेली. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात रमेश बखतावरमल मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता.
आणखी वाचा-मैत्रीला कलंक! दिल्लीतील फॅशन डिझायनरवर मुंबईत बलात्कार, पीडितेच्या व्यावसायिक मित्रानेच केला घात!
पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश आपल्या पथकांना दिले होते. यानुसार तपास पथकांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहिती संकलानाचे काम सुरु केले होते. या तपासादरम्यान सदर महिला ही अलिबाग शहरात येणार असल्याची गोपनीय बातमीदार यांचेकडून पोलीसांना मिळाली होती. शहरातील गर्दीचे व महत्त्वाचे ठिकाणी सापळा रचला. सदर अनोळखी महिला ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, एका दुकानात आली असताना, तिला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
वनिता प्रदीप वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती गांधीनगर, अपर बिबवेवाडी, पुणे येथील रहिवाशी आहे. पती प्रदीप वाघमारे याचे मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे यापुर्वी कोल्हापुर शहर येथे अशाच प्रकारचा गुन्हा केला असल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर पोलीसांनी तीचा पती प्रदीप नागनाथ वाघमारे यालाही अटक केली असून त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेला मुद्देमाल १५ ग्रॅम वजनाची एकुण ९५ हजार रुपये किमतीची किंमतीची सोन्याची चैन हस्तगत केली आहे. पोलीस हवालदार अतुल जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या तपासात पोलीस निरीक्षक शिरीष पवार सहा.पोलीस निरीक्षक दराडे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस हवालदार अतुल जाधव, यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे.