सातारा : फलटण-पंढरपूर मार्गावर (पालखी महामार्ग) बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत भरधाव मोटारीची कंटेनरला धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

विजापूर येथून पाडेगाव खंडाळा येथे येत असताना बरडगावच्या हद्दीत भरधाव मोटारीची पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला धडक झाली. या अपघातात सागर रामचंद्र चौरे (पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (खेड बु., ता. खंडाळा,) नीलेश चंद्रकांत शिर्के (वेटणे, ता. खटाव, मूळ रा. खटाव, ता. खटाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते सर्वजण विजापूर (कर्नाटक) येथे बंद पडलेला ट्रक दुरुस्त करण्यासाठी मोटारीतून विजापूर येथे गेले होते. काम आटोपून परतीच्या प्रवासात पहाटे बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरने धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मोटारीतील तिघा गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Prakash Ambedkar On OBC reservation
Prakash Ambedkar : ‘विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
Arvind Sawant
Arvind Sawant Apologise : गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांनी व्यक्त केली दिलगिरी, पण ‘या’ नेत्यांची नावे घेत म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा…महाबळेश्वरला दिवाळी हंगामापूर्वीच वाहतूककोंडी

u

अपघातानंतर चालकाने कंटेनरसह पळ काढला; परंतु अपघातामध्ये कंटेनरचा रेडीएटर फुटल्याने तो राजुरी (ता. फलटण) या गावाजवळ बंद पडला. चालकाने कंटेनर जागेवरच सोडून तेथून पळ काढला.

अपघाताची माहिती समजताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आपल्या सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तातडीने घटनास्थळाला भेट दिली.

Story img Loader