श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या कालावधीत िदडय़ातील वाहनांना टोल माफी मिळावी आणि संबंधित ग्रामपंचायती, नगर परिषदा यांच्या निधीत वाढ होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असे पुणे जिल्ह्णााचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पालखी सोहळ्याच्या कालावधीत आरोग्य, वाहतूक, पिण्याचे पाणी, रस्त्यांची व्यवस्था, स्वच्छता आणि कायदा आणि सुव्यवस्था याबाबतीत सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे आणि त्यांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि सोलापूर जिल्ह्णााचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारीविधान भवन येथे बठक झाली. त्या वेळी पालकमंत्री बापट यांनी या सूचना दिल्या.

या बठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, खासदार अमर साबळे, आमदार बाबूराव पाचर्णे, अ‍ॅड. राहुल कुल, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, दत्तात्रय भरणे, अ‍ॅड. रामहरि रूपनवर, विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम आदी उपस्थित होते.

बापट यांनी सांगितले, की िदडीमध्ये सहभागी असणाऱ्या वाहनांना टोल माफी देता येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी प्राथमिक तत्त्वावर चर्चा केली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल.

पालखींचा मुक्काम ज्या ग्रामपंचायत हद्दीत किंवा नगरपरिषदांच्या हद्दीत असतो, त्यांना दिला जाणाऱ्या निधीत वाढ करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्यावर या निधीत वाढ करण्यासाठी आपण सकारात्मक असून त्यासाठी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे बापट यांनी सांगितले.

बठकीत प्रथम पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्णााच्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले. दोन्ही पालखी पुणे जिल्ह्णाात ज्या मार्गावरून जातात त्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी एकदिशा मार्ग केला जाणार आहे. पालखी मार्गावरील खाद्यपदार्थाची दुकानांची अन्न आणि औषधे प्रशासनाच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत गटाची पथके तनात केली जाणार आहेत. पालखी तळाच्या ठिकाणी वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी वीज वितरण कंपनीची फिरती पथके तनात केली जाणार आहेत. त्याचबरोबर िदडी प्रमुखांनी अनुदानित सिलिंडरसाठी आवश्यक तो अर्ज भरून संबंधित विभाग किंवा गॅस कंपनी यांच्याकडे सुपूर्द करावा. त्यामुळे त्यांना अनुदानित सिलिंडर देता येईल, असेही राव यांनी सांगितले.

या वेळी पालखी तळावरील अतिक्रमणे काढून टाकावीत, इंदापूरमधील कचरा डेपोमधून जाणाऱ्या पालखी मार्गाच्या दुतर्फा पत्र्याचे कुंपण करावे, सासवडच्या पुलाची दुरुस्ती करावी, पालखी मार्गावरील विहिरींचे अधिग्रहणही करावे, त्याचबरोबर पाण्याची तपासणी करावी, आवश्यक तिथे रस्ता रुंदीकरण आणि साईडपट्टय़ा भरून घ्याव्यात, मोबाइल कनेक्टिव्हिटी सुरळीत राहावी यासाठी फिरते मोबाइल टॉवर उभा करावा, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. या वेळी सातारा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, सोलापूर जिल्हाधिकारी रणजित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, साताराचे नितीन पाटील, सोलापूरचे अरुण डोंगरे त्याचबरोबर पोलीस, आरोग्य, परिवहन, पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासाठी उपाययोजना

  •  मार्गावरील खासगी रुग्णालयातील खाटा आरक्षित ठेवणार
  •  आळंदी परिसरातील स्वच्छतेसाठी निधी देणार
  •  ‘मोबाइल कनेक्टिव्हिटी’साठी फिरते टॉवर उभारणार
  •  सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून शौचालये उभारणार
  •  पालखी तळावरील अतिक्रमणे काढा, स्वच्छता ठेवा
  •  सहभागी होणाऱ्या वाहनांची तपासणी करणार.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll free to varkari says girish bapat
First published on: 08-06-2016 at 02:26 IST