रत्नागिरी : लोकशाहीमध्ये कोणीही, कुठेही सभा घेऊ शकतो. पण म्हणून प्रत्येक सभेला उत्तर दिले जात नाही. पण रामदास कदम एका पिसाने मोर होतात. उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी सभा घेणे हा पोरकटपणा आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या ५ मार्च रोजी ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला उत्तर देण्यासाठी रविवारी त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ‘निष्ठावंतांचा एल्गार’ असे या सभेचे वर्णन कदम पिता-पुत्रांनी केले आहे. त्याबाबत छेडले असता आमदार जाधव म्हणाले की, खरे तर शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संयमाने वागावे, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे ही उत्तर सभाह्ण म्हणजे त्यांच्यासाठी राजकीय ‘उत्तरकार्य’ ठरेल. आता हे उत्तर देणार म्हणजे नेमके काय करणार? कशाचे उत्तर देणार? गद्दारी का केली, याचे उत्तर देणार का? किती खोके घेतले याचे उत्तर देणार का ? की पक्ष सोडताना तुम्ही किती खोटे बोललात याचे उत्तर देणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत शुक्रवारी केलेल्या वक्तव्यावर टिप्पणी करताना जाधव म्हणाले की, भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक, असे असते. पण त्या बैठकीतील चर्चेत मात्र ते खरे बोलले. अर्थात शिंदे यांना दिलेल्या जागांपैकी  किती पाडणार, ते खासगीत सांगतील.