ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेतून भाजपासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा-शिंदे गटातील जागा वाटपावरून उद्धव ठाकरेंनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला. “बावनकुळेसाहेब, तुमच्या नावाएवढ्या किमान ५२ जागा तरी मिंधे गटाला द्या. त्यांची काहीतरी लायकी ठेवा,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी केली.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “आताचे भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत. त्या बावनकुळेंनी सांगितलं की, आम्ही मिंधे गटाला फक्त ४८ जागा देणार आहोत. पण आहो बावनकुळेसाहेब, तुमच्या नावाएवढ्या किमान ५२ जागा तरी द्या. त्यांची काहीतरी लायकी ठेवा. एवढ्या असंख्य जिवंत माणसांचं प्रेम त्याग करून ते तुमच्या खोक्यात घुसलेले सगळे मिंधे आहेत. त्यांना तुम्ही ४८ जागांमध्येच आटोपणार का?”

amravati lok sabha seat, Navneet Rana, Ravi Rana, Abhijeet Adsul , Support from Abhijeet Adsul, Lok Sabha Election, Navneet Rana visited Abhijeet Adsul home, Navneet Rana and Ravi Rana, amravati news, lok sabha 2024, poitical news,
मनधरणीचे प्रयत्न… नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची घेतली भेट, पण…
Candidate of Mahavikas Aghadi in Buldhana Constituency Narendra Khedekars candidature application filed
“ही गद्दार विरुद्ध खुद्दार, अशी लढाई”, सुषमा अंधारे कडाडल्या; नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
thackeray group leader sanjay jadhav on cm eknath shinde
संजय जाधवांनी महायुतीविरोधात थोपटले दंड; म्हणाले, “उद्धव ठाकरे कसलेले पैलवान तर मुख्यमंत्र्यांची अवस्था…”
Vijay Wadettiwar and Balasaheb Thorat Not Happy With Shivsena First List
“उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर..”, ठाकरे गटाच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी

हेही वाचा- “स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान…”, उद्धव ठाकरेंचा थेट राहुल गांधींना इशारा

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातील भाजपाला विचारतोय, तुम्ही (भाजपा) मिंध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का? असं असेल तर आम्ही मिंध्यांना नेता मानून निवडणुका लढणार आहोत, हे भाजपाने जाहीर करावं. जर भाजपाला असं वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तर तुमचे ५२ नव्हे तर १५२ कुळं खाली उतरली तरी कुणी शिवसेना तोडू शकत नाही. प्रयत्न करून बघा.”

हेही वाचा- “सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचंय आणि…”, मालेगावातून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल!

“मी तर म्हणतो, आता तातडीने निवडणुका घ्या. हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो. बघुया महाराष्ट्र कुणाला कौल देतो. स्वत:कडे कर्तृत्व शून्य असताना ते गद्दारी करून मुख्यमंत्री झाले. त्यांना अजूनही माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतंय, हा तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकारणात जन्म दिला. त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन फिरत आहेत” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं.