राहाता : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतकर्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत महायुती सरकारने जाहीर केली असून, दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
गेल्या सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये विविध जिल्ह्यातील ६० लाख हेक्टर क्षेत्राचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचे अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झाले आहेत. सर्व भागांची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल तसेच कृषी विभागाला दिल्या होत्या.
त्यानुसार जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आकडेवारी आणि मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. शासन निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्याला ८४६ कोटी ९६ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून, याचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकर्यांना मिळेल, असे मंत्री विखे यांनी सांगीतले.
मदतीचा निधी वर्ग करताना शासन नियम आणि निकषांचे पालन करण्याच्या तसेच नैसर्गिक आपत्ती करिता असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता तसेच लाभार्थींची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. राज्यातील अन्यही जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची परिस्थिती विचारात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रूपयांच्या मदतीचा निर्णय घेऊन दिवाळीपूर्वी बाधित शेतकर्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतकर्यांना ८४६ कोटी ९६ लाख रूपयांची मदत महायुती सरकारने जाहीर केली असून, दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याची माहिती विखे यांनी दिली.
गेल्या सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये विविध जिल्ह्यातील ६० लाख हेक्टर क्षेत्राचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचे अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झाले आहेत. सर्व भागांची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल तसेच कृषी विभागाला दिल्या होत्या.
राज्यातील अन्यही जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची परिस्थिती विचारात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रूपयांच्या मदतीचा निर्णय घेऊन दिवाळीपूर्वी बाधित शेतकर्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याचे आश्वासन दिले आहे.