छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री तरूणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला. यानंतर जमावाने दगडफेक करण्यात सुरूवात केली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. आता परिस्थिती नियंत्रणात असली, तरीही विरोध सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैर झडत आहेत. आता खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जलील म्हणाले, “किराडपुरा भागात इतक्या कमी वेळेत मुलं एकत्र कोठून, कशी आली. त्या तरूणांचे कोणाबरोबर संबंध आहेत, हे सर्व शोधण्याची गरज आहे. समाजकंटक दोन-अडीच तास रस्त्यावर होते. तुम्हाला दंगल करून दगडफेक आणि गाड्या जाळायच्यात तर जाळा, अशी मोकळीक त्यांना देण्यात आली होती.”

हेही वाचा : संभाजीनगर आणि मालवणी येथील घटनांवर शरद पवारांनी पहिल्यांदाच केल भाष्य; म्हणाले…

“१३ गाड्या जाळण्यात आल्या, असं पोलीस सांगत आहेत. मग, त्या गाडीत आलेले पोलीस कुठं होते. प्रत्येकी गाडीत एकच पोलीस कर्मचारी बसला होता का? राममंदिरात मी स्वत:हा होतो. तिथे फक्त १५ पोलीस होते. या पोलिसांवर राममंदिरासह बाहेर बाहेरच्या दंगलीचीही जबाबदारी होती. तेव्हा अन्य अधिकारी आणि अधिक मागवण्यात आलेली कुमक कुठे होती?,” असा सवाल जलीस यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दंगल करणारे मंदिरात घुसले असते, तर आम्ही काय करणार नाही, अशी पोलिसांची भूमिका होती. १५ पोलीस कर्मचाऱ्यांना मरण्यासाठी सोडलं होतं. बाहेर कोणी नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, अशी मोकळीक देण्यात आली होती,” असेही जलील यांनी म्हटलं.