शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ररस्त्यांवरून राज्य सरकारवर केलेल्या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या टीकेमध्ये काही तथ्य नाही. केवळ स्वत:कडे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी हे सुरू आहे. २५ वर्षांमध्ये डांबरीकरणाच्या रस्त्यात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने २२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. २५ वर्षांत २२ हजार कोटी खर्च करून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत. या खड्ड्यातले मृत्यू तुम्ही दिलेत. या खड्ड्यातील अपघात तुम्ही दिले आहेत. आता ३०-४० वर्ष टिकणारी सिमेंट, काँक्रिटचे रस्ते होताय आणि त्यामध्येही दायित्व कालावधी २० वर्षांचा आहे. काही किंमत ही २० वर्षांत त्यांना दिली जाणार आहे. अशा स्वरुपाच्या कंत्राटाच्या प्रक्रियेतील ही पारदर्शकता आहे आणि म्हणून हे पोटातलं दुखणं आहे.”

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
nagpur, truck driver kidnapped minor girl, police, solved case
ट्रक चालकांकडून अल्पवयीन; मुलीचे अपहरण, तीन तासांत छडा
100 Ghungaru Nagin Chappal Price Will Shock You Watch Video
७ नागाचे फणे, सहा किलो वजन, पंढरपूरच्या दानवेंची ‘नागीण चप्पल’ दिसते कशी? किंमत ऐकून थक्कच व्हाल
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..

आदित्य ठाकरे काय म्हणाले आहेत? –

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला आहे. ६००० कोटी रुपयांचं काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होत असताना कोठेही लोकप्रतिनिधींना विचारण्यात आलं नाही. हा प्रत्येक पक्षातील नगरसेवकांचा अपमान आहे. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा – “उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करू नये, स्वत: काही केलं नाही…” आशिष शेलारांचं टीकास्त्र!

याचबरोबर “४०० किलोमीटरच्या कामांना किती वर्ष लागणार आहेत. तीन ते चार वर्षांचे टेंडर एकाच वेळी काढत नाही ना? यामुळे आर्थिक संकट ओढावलं जाणार आहे. एक किलोमीटरचा रस्ता दहा कोटी रुपयांत होणार होता. आता तो १७ कोटी रुपयांत होणार आहे.” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे.