यवतमाळ : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड आता भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरुणी आत्महत्याप्रकरणी त्यांना ‘पवित्र’ करून घेतले जाऊ शकते. आम्ही मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा करू. आमच्याजवळसुद्धा ३८ मिनिटांची सीडी आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

जिल्ह्यातील संतप्त शिवसैनिकांनी आज सोमवारी आमदार राठोड यांच्याविरुद्ध आंदोलन केले. या वेळी गायकवाड बोलत होते. या वेळी यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे म्हणाले, राठोड हे ‘बेन्टेक्स’ नेते आहेत. त्यांच्याशी संबंधित अनेक प्रकरणे दडलेली आहेत, ती सर्व प्रकरणे उजेडात आणू आणि निष्ठावंताच्या सहकार्याने आणि परिश्रमाने शिवसेना आणखी बलवान बनवण्याचा प्रयत्न करू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चापूर्वी टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या निषेध सभेत जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, प्रवीण पांडे, बाबू पाटील जैत, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, अ‍ॅड बळीराम मुटकुळे, चितांगराव कदम, आदी उपस्थित होते.