News Flash

आलिया भट्ट करणार एस. एस. राजामौलींचा चित्रपट

एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सह अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार

आलिया भट्ट करणार एस. एस. राजामौलींचा चित्रपट
आलिया भट्ट आणि एस. एस. राजामौली

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळीच छाप उमटवली आहे. प्रत्येक कलाकराचं एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटात काम करण्याच स्वप्न असतं. राजामौली यांच्या चित्रपटात करण्याचा एक वेगळाच आणि अविस्मरणीय अनुभव असतो असं अनेक कलाकारांच्या तोंडून ऐकायला मिळत असतं. आता राजामौलींचा ‘RRR’ चित्रपट येत आहे. तसेच ते चित्रपटातील नायिकेच्या शोधात असल्याचंही समोर आलं होतं. सूत्रांनुसार एस. एस. राजामौली यांचा शोध संपला असून चित्रपटात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सह अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार असल्याचे समोर आलं आहे.

राजामौली यांनी बक्कळ मानधन देऊनही अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटात भूमिका साकारण्यास नकार दिला होता. परंतू आता आलियाने तिचा निर्णय बदलला आहे. राजामौली यांनी या आधी चित्रपटातील नायिकेसाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आलिया भट्टचा विचार केला होता. त्यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या माध्यमातून आलियाशी संपर्कसुद्धा साधला होता. मात्र आलियाने ही ऑफर नाकारली आहे. व्यग्र वेळापत्रकाचं कारण देत तिने ही ऑफर नाकारली असल्याचं समजलं होतं.

‘राजी’ आणि ‘गली बॉय’च्या यशानंतर आलियाकडे बरेच चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले आहेत. तिच्या दमदार अभिनयाची प्रशंसा होऊ लागली आहे. सध्या आलिया भट्ट तिचा आगामी चित्रपट ‘कलंक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वरुन धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि कुणाल खेमु हे देखील चित्रपटात झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 11:11 am

Web Title: aalia bhatt is ready work with ss rajamouli
Next Stories
1 ‘ब्रॅडचं दारूचं व्यसन आणि जळफळाट यामुळे आमचा घटस्फोट’
2 तिसऱ्यांदा शो रद्द झाल्याने सोना मोहपात्राची सोनू निगमवर टीका
3 आयुषमानचा सुपरहिट ‘अंधाधून’ चीन मध्ये होणार प्रदर्शित
Just Now!
X