मनोरंजन जगतात सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पण, बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान सुलतानचा ट्रेलर पाहिल्यानंतर स्तब्धचं झाला. काही दिवसांपूर्वीच आमिरच्या दंगल आणि सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटात साम्य असल्याच्या चर्चा होत्या. पण चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आमिरचाही यावर विश्वास बसला आहे.
‘सुलतान’चा ट्रेलर पाहिल्यानंतर आमिरने लगेच चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा याला फोन लावल्याचे वृत्त आहे. ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या धोबीपछाड सीन हा दंगल चित्रपटातील आहे. त्यामुळे आमिर आणि आदित्य या दोघांमध्ये फोनवर बराच वादविवाद झाल्याचे कळते. धोबीपछाड सीन हा ‘दंगल’मधील महत्त्वाचा पैलू असल्यामुळे आमिर बराचं भडकला आहे.
आमिर त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी बरीचं मेहनत घेतो. ‘दंगल’साठी त्याने आपल्या वजनात बदल केले. त्याने आधी जवळपास २५ किलोपेक्षा जास्त वजन वाढविले आणि तितकेच वजन नंतर कमीही केली. गेल्या वर्षभरापासून आमिर ‘दंगल’ चित्रपटासाठी मेहनत घेतोय. त्यामुळे आपले सर्व प्रयत्न व्यर्थ जावेत असे तो नक्कीच इच्छित नाही.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2016 रोजी प्रकाशित
‘सुलतान’चा ट्रेलर पाहून आमिर भडकला!
या दोघांमध्ये फोनवर बराच वादविवाद झाल्याचे कळते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 07-06-2016 at 12:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan enraged over similarities in salman khan starrer sultan