News Flash

राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट

एवढचं नव्हे तर वियानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला आई शिल्पा शेट्टीने प्रसिद्ध केलेलं स्टेटमेंट शेअर केलंय.

shilpa-shetty-raj-kundra-son-viaan-post
(Photo-Instagarm@viaanrajkundra)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर देशभरातच खळबळ माजली आहे. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होवू लागले आहेत. यातच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या अटकेनंतर जवळपास १४ दिवसांनी २ ऑगस्टला सोशल मीडियावर एक स्टेटंमेंट जारी करत तिचं मौन सोडलं. शिल्पाने शेअर केलेल्या स्टेटमेंटमध्ये तिने तिच्या कुटुंबाच्या गोपनियतेचा आदर राखण्याची विनंती केली आहे.

शिल्पाच्या या पोस्टनंतर आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा वियानने वडिलांच्या अटकेनंतर पहिली पोस्ट शेअर केलीय. वियानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आई शिल्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. आईला मिठी मारत आई सोबत निवांत क्षण घालवतानाचे काही फोटो वियानने शेअर केले आहेत. या फोटोंना वियानने कोणतही कॅप्शन दिलेलं नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viaan Raj Kundra (@viaanrajkundra)

आणखी वाचा: Raj Kundra case: ‘त्या’ पोस्टनंतर शिल्पा शेट्टीला वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिससह बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा
एवढचं नव्हे तर वियानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला आई शिल्पा शेट्टीने प्रसिद्ध केलेलं स्टेटमेंट शेअर केलंय.

shilpa-shetty-post (Photo-Instagarm@viaanrajkundra)

सोमवारी २ ऑगस्टला शिल्पा शेट्टीने हे स्टेटमेंट प्रसिद्ध केलं होतं. शिल्पाने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. ‘गेले काही दिवस आमच्यासाठी आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप केले जात आहेत. माध्यमांनी आणि काही लोकांनी माझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आले, प्रश्न विचारले गेले. मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि या प्रकरणात मी हे करणं टाळत राहणार आहे कारण हे सगळं न्यायालयीन आहे, म्हणून माझं नाव घेऊन कोणतीही चुकीची विधान पसरवू नका,’ असं ती या पोस्टमध्ये म्हणाली होती.

शिल्पा शेट्टीच्या या पोस्टनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे. तसचं अभिनेता वरुण धवन, मिजान झाफरी, दिया मिर्झा अशा अनेकांनी शिल्पाच्या पोस्टला लाइक देत पाठिंबा दर्शवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2021 4:32 pm

Web Title: after raj kundra arrest son viaan kundra share first post on instagram share photo with mother shilpa shetty kpw 89
Next Stories
1 “लाज वाटली पाहिजे” म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला दिव्यांका त्रिपाठीचं उत्तर
2 अमृता पवार म्हणतेय ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’
3 “माझ्या पतीला…”; राखी सावंतने ‘बिग बॉस १५’च्या निर्मात्यांना केली विनंती
Just Now!
X