बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे देशभरात लाखो चाहते आहेत. नुकताच ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ २७ वर्ष जुना आहे. १९९४ सालामध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब मिळवल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचं लक्षात येतंय. या व्हिडीओत ऐश्वर्याची आई देखील दिसत आहे.
मिस वर्ल्डचा मुकुट जिंकल्यानंतर ऐश्वर्याने अनेक सामाजिक कार्यक्रमांना देखील हजेरी लावली होती. ऐश्वर्याच्या फॅन क्लबने याचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ऐश्वर्या तिच्या आईसोबत एका काही शाळकरी मुलांसोबत दिसत आहे. या शाळकरी मुलांना ती भेटवस्तू देतेय. तर एका रडणाऱ्या मुलाला ऐश्वर्या गोंजारत शांत करताना दिसत आहे. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा: “उदय चोप्रा आणि मी पाच वर्ष…”; नरगिस फाकरीने अखेर सोडलं मौन
ऐश्वर्याच्या फॅन क्लबने वेगवेगळ्या इव्हेंटचा एकत्रित असा हा व्हीडीओ तयार केला आहे. यातील एका कार्यक्रमात ऐश्वर्या एका हत्तीला सॅल्यूट करताना दिसत आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतला होता.