29 October 2020

News Flash

अनिल कपूर म्हणतात, ‘बदल घडवण्यासाठी एक माणूस पुरेसा आहे’!

वाचा, अनिल कपूर असं का म्हणतायेत

अनिल कपूर

अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा गड राखून आहे. या चित्रपटाने केवळ १८ दिवसांमध्ये २३० कोटी रुपयाची कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट लवकरच २५० कोटींच्या घरात पोहोचेल असं दिसून येतंय. या चित्रपटाच्या यशानंतर आता अजय त्याच्या आगामी ‘मैदान’ चित्रपटाकडे वळला आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर अभिनेता अनिल कपूर यांनी शेअर केलं आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अजय एका सामान्य माणसाच्या रुपात दिसत असून त्याच्या एका हातात छत्री आणि बॅग आहे. परंतु या वेशातही तो फुटबॉल खेळताना दिसत आहे. हे पोस्टर अजयने शेअर केलं आहे. इतकंच नाही तर अजयने पोस्टर शेअर केल्यानंतर अनिल कपूर यांनीही ते शेअर करत एक भन्नाट कॅप्शन दिलं.

वाचा : तापसीनं घडवली अद्दल; स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचं मोडलं बोट

“बदलाव लाने के लिए एक अकेला भी काफी होता हैं”, असं कॅप्शन अनिल कपूर यांनी हे पोस्टर शेअर करत दिलं आहे. त्यामुळे त्यांची ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

वाचा : कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन; आकडा ऐकाल तर व्हाल थक्क

दरम्यान, ‘मैदान’ हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा करत असून निर्मिती बोनी कपूर करत आहेत. झी स्टुडिओअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त प्रियामणी, गजराव आणि बोमण इराणीदेखील आहेत. ‘मैदान’ २७ नोव्हेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 11:48 am

Web Title: ajay devgn look from maidaan ajay devgan share maidaan poster ssj 93
Next Stories
1 आसावरीला अभिजीतपासून वेगळं करणार सोहम?
2 रोहिणी हट्टंगडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर; ‘या’ मालिकेत साकारणार भूमिका
3 कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन; आकडा ऐकाल तर व्हाल थक्क
Just Now!
X