04 March 2021

News Flash

AK vs AK: अनुराग कश्यपने फेकले अनिल कपूर यांच्या तोंडावर पाणी

जाणून घ्या सविस्तर...

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेते अनिल कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये अनिल कपूर अनुराग कश्यपला फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा फ्रॉड आहे असे बोलताना दिसतात. त्यानंतर अनुराग कश्यप रागात त्यांच्या चेहऱ्यावर ग्लासामधील पाणी फेकतो. सध्या त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या AK vs AKच्या ट्रेलर आहे. ट्रेलरमध्ये अनुराग आणि अनिल यांच्यामधील भांडणे पाहून हा चित्रपटाचा एक भाग आहे की एका शोमध्ये खरच असे झाले आहे हे समजणे कठिण झाले आहे.

ट्रेलरची सुरुवात अनुराग आणि अनिल एका शोमध्ये गप्पा मारताना दिसतात. अनिल कपूर अनुराग कश्यपला फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा फ्रॉड आहे असे बोलताना दिसतात. त्यानंतर अनुराग कश्यप रागात त्यांच्या चेहऱ्यावर ग्लासामधील पाणी फेकतो.

आणखी वाचा- अनिल कपूर- अनुराग कश्यप यांच्यात जोरदार ट्विटर-वॉर

दरम्यान ते दोघे एकत्र चित्रपट करण्याचा निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात अनिल यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील मुलगी सोनम कपूरचे अपहरण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. सोनमला शोधण्यासाठी अनुराग अनिल कपूरला १० तासांची वेळ देतो. त्यानंतर अनिल कपूर सोनमला शोधण्यास सुरुवात करतात. या चित्रपटात सोनम कपूर व्यतिरिक्त अनिल कपूरचा भाऊ निर्माता बोनी कपूर देखील सहभागी होणार आहे.

AK vs AK या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने करणार आहेत. त्यांनी यापूर्वी २०१८मध्ये प्रदर्शित झालेला ‘भावेश जोशी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. AK vs AK हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:24 pm

Web Title: ak vs ak official trailer anil kapoor anurag kashyap avb 95
Next Stories
1 ‘चला देशभक्तांनी देखील रस्त्यांवर या’; कंगना रणौतने ‘भारत बंद’ला केला विरोध
2 love story : …म्हणून शर्मिला टागोर यांना मंसूर अली खान यांनी दिला होता रेफ्रिजरेटर
3 नीतू कपूर आणि वरून धवन पाठोपाठ क्रिती सेनॉनला करोनाची लागण
Just Now!
X