News Flash

अक्षय कुमार आणि लिओनार्दो दि कॅप्रिओ यांना पुरस्कार जाहीर; पर्यावरण संवर्धनासंदर्भातील कामाचा सन्मान

गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित

पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जगभरातील कलाकार, सेलिब्रिटी दीर्घकाळापासून काम करत आहेत. भारतातलेही काही आघाडीचे कलाकार अशा सामाजिक कार्यांमध्ये सहभागी आहेत, अनेक जण पुढाकार घेत आहेत. अभिनेता अक्षय कुमार हा त्यापैकीच एक. त्याच्या कार्यासाठी त्याला एक मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

पर्यावरणासंबंधित कामासाठी अभिनेता अक्षय कुमारला गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच्यासोबत हॉलिवूड अभिनेता लिओनार्दो दि कॅप्रिओ यालाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार भारतातल्या स्वच्छतेच्या प्रश्नाबद्दल सतत काम करत असतो. लोकांना प्रोत्साहन देत, त्यांच्यात जागरुकता निर्माम करण्याचे काम करत असतो. तर लिओनार्दो दि कॅप्रिओ जैवविविधतेच्या सुरक्षेसाठी, महासागर आणि जंगलांच्या संवर्धनासाठी तसंच हवामान बदलाच्या प्रश्नावर काम करत आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

या यादीत अभिनेत्री एमा वॅटसन आणि सारा मार्गारेट क्वाले यांचाही समावेश आहे.

बॉलिवूडमध्ये बरेच सेलिब्रिटी काही ना काही सामाजिक काम करत आहेत. दिया मिर्झा पर्यावरणासंदर्भात युनिसेफ या संघटनेची ब्रँड अम्बॅसिडर आहे तर अजय देवगण पर्यावरणपूरक उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात काम करत आहे. हवामान बदलाच्या संदर्भात अमिताभ आणि अभिषेक बच्चनही काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 7:14 pm

Web Title: akshay kumar and leonardo dicaprio awarded for their work in environment vsk 98
Next Stories
1 ‘सत्यशोधक’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 गश्मीर महाजनीच्या मुलाची मुंज? मुलाच्या ‘या’ फोटोंवर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
3 Video: नेहा कक्करने असे काय केले की अनू मलिकने स्वत:च्याच कानशिलात लगावली
Just Now!
X