News Flash

‘राम सेतू’मध्ये अक्षयसोबत दिसणार या अभिनेत्री?

अक्षयने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे.

अभिनेता अक्षय कुमार आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘राम सेतू’ असे आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटात आणखी दोन अभिनेत्री दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा दिसत आहेत. हा फोटो पाहून नुसरत आणि जॅकलिन अक्षयसोबत त्याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

हा फोटो शेअर करत अक्षयने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘ज्या चित्रपटाची टीम ही नेहमी एकत्र असते ती टीम चांगली काम करते. राम सेतू चित्रपटाच्या कथेचे वाचन… आता या चित्रपटाचे चित्रीकरणासाठी मी उत्सुक आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

लवकरच अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरैशी आणि आणखी काही बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत. याशिवाय अक्षयचा ‘अतरंगी रे’ आणि ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 4:44 pm

Web Title: akshay kumar shares an update about the film ram setu avb 95
Next Stories
1 राजकीय पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांवर अक्षय कुमारचा खुलासा, म्हणाला…
2 ‘मी टेलिव्हिजन विश्वातून ब्रेक घेतोय’, अभिनेत्याचा खुलासा
3 ‘पोरगं मजेतय’ प्रदर्शनासाठी सज्ज
Just Now!
X