News Flash

‘नेव्ही ऑफिसर’ अक्षय कुमार

अक्षय आता नौदल अधिका-याच्या भूमिकेत

बॉलीवूडला एकापाठोपाठ एक देशभक्तीपर चित्रपट देणारा अभिनेता अक्षय कुमार आणखी एका देशभक्तीपर चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. ‘एअरलिफ्ट’ चित्रपटात हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या भूमिकेनंतर अक्षय आता नौदल अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे.
आगामी ‘रुस्तम’ या चित्रपटात अक्षय नौदल अधिका-याची भूमिका साकारत असून याचा फर्स्ट लुक प्रसिध्द झाला आहे. नेव्ही ऑफिसरच्या गणवेशात अक्षय जिगरबाज दिसत आहे. नौदलाचा  पांढ-या रंगाचा गणवेश आणि टोपी, छातीवर लावलेली पदके असा अक्षयचा लूक यात पाहावयास मिळतो. अक्षय यात  ‘रुस्तम पावरी’  या नावाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. बेबी चित्रपटाचा दिग्दर्शक नीरज पांडे रुस्तमचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट १२ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:14 pm

Web Title: akshay kumar starrer rustoms first look revealed
Next Stories
1 संजय दत्तचा गजाआडचा प्रवास आणि त्याचे चित्रपट
2 .. म्हणून सोनमने अंगरक्षकाला फटकारले
3 कुस्तीगीर खली जखमी
Just Now!
X