News Flash

अक्षय कुमार करोना पॉझिटिव्ह, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

अक्षय सध्या होम क्वारंटाइन आहे.

गेल्या वर्ष भरापासून करोनाच संकट आपल्यावरून काही गेलेले नाही. आता तर करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. तर, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला करोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या अक्षय होम क्वारंटाइन आहे.

अक्षयने ट्विट करत करोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. “मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आज सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी मी विनंती करतो की त्यांनी स्वत: करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. लवकरच अॅक्शनमध्ये परत येईल” अशा आशयाचं ट्विट करत अक्षयने त्याला करोनाची लागन झाल्याची माहिती सगळ्यांना दिली आहे.

काही दिवसांपूर्वी आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण आणि त्याच्या पत्नी या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 9:56 am

Web Title: akshay kumar test positive for covid 19 dcp 98
Next Stories
1 विवाहित पुरुषावर प्रेम करणं म्हणजे…मला विचारा; रेखा यांच्या उत्तराने सगळे थक्क
2 आलिया भट्टला करोनाची लागण; आईची चिंता वाढली म्हणाल्या…
3 ‘हिंदीमध्ये काम मिळवणे अवघड नाही’
Just Now!
X