News Flash

अक्षय कुमार या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार

अॅक्शन हिरो म्हणजे अक्षय अशीच त्याची एक ओळख आहे

अभिनेता अक्षय कुमार

‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ या सिनेमाला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर अक्षय कुमार सध्या त्याचा ५० वा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा करण्याचा बेत आखतोय. वाढदिवसाचं सेलिब्रेशन झाल्यावर लगेच तो कामाला सुरूवात करेल. २०१७ आणि २०१८ ही दोन्ही वर्षे अक्षयचीच आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. लवकरच तो अजून एका दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

शाहरुखने असे केले गणरायाचे विसर्जन

अॅक्शन हिरो म्हणजे अक्षय अशीच त्याची एक ओळख आहे. त्याच्या या ओळखीला साजेसा असा अजून एक सिनेमा तो करणार आहे. अजिथ स्टारर ‘वीरम’ या सिनेमाच्या बॉलिवूड रिमेकमध्ये तो दिसेल. सध्या तरी या सिनेमाचे तात्पुरते नाव ‘लँड ऑफ लुंगी’ असे ठेवण्यात आलेय.
अक्षयचा हा पहिलाच दाक्षिणात्य रिमेक आहे असे नाही. याआधीही त्याने अनेक दाक्षिणात्य सिनेमांच्या रिमेकमध्ये काम केलेय. ‘रावडी राठोड’, ‘हॉलिडे’ हे सिनेमेही रिमेकच होते. साजिद- फरहाद या जोड गोळीपैकी फरहाद हा या सिनेमाचे दिग्दर्शन करेल. तर त्याच्या या सिनेमाची निर्मिती साजिद नादियादवाला करणार असल्याचे म्हटले जातेय. अक्षयच्या भूमिकेबद्दल बोलायचे झाले तर तो पूर्णपणे दाक्षिणात्य अभिनेत्याप्रमाणे लुंगीमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जातेय. या सिनेमाची कथा ग्रामीण भागात घडणारी दाखवण्यात येईल.

चार भावांपैकी एक अविवाहीत भाऊ म्हणून अक्षय दिसेल. मोठ्या भावाप्रमाणे बाकीचे तीन भाऊ अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतात. पण कालांतराने हे तीनही भाऊ वेगवेगळ्या मुलींच्या प्रेमात पडतात. या तिघांनाही लग्न करण्याची इच्छा असते पण मोठ्या भावाच्या शब्दाबाहेर ते नसतात. म्हणून हे तीन भाऊ मोठ्या भावालाही एका मुलीच्या प्रेमात पाडण्यासाठी प्लॅन करतात. सिनेमाची कथा जरी मजेशीर वाटत असली तरी क्लायमॅक्स मात्र काही वेगळाच असणार आहे.

मुळ ‘वीरम’ सिनेमात तमन्ना भाटिया ही अजिथची अभिनेत्री दाखवण्यात आली होती. तमन्नाने याआधीही अक्षयसोबत ‘एण्टरटेनमेन्ट’ या सिनेमात काम केले आहे. पण आता या सिनेमातही तमन्ना दिसणार की दुसरी अभिनेत्री दिसणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे अक्षयचे ‘पॅडमॅन’, ‘२.०’, ‘गोल्ड’, ‘मोगुल’ आणि ‘केसर’ हे सिनेमेही येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 2:37 pm

Web Title: akshay kumar to star in the remake of the south film veeram
Next Stories
1 ‘पहरेदार पिया की’चे निर्माते घेऊन येताहेत ‘ही’ नवी मालिका
2 Bihar Flood victims : बिहार पूरग्रस्तांना आमिरची आर्थिक मदत
3 PHOTOS : अभिनेता आफताब शिवदासानीचा श्रीलंकेत पारंपरिक पद्धतीने विवाह
Just Now!
X