15 July 2020

News Flash

दुसऱ्या मुलासाठी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला घातली होती ही अट

एका शोमध्ये ट्विंकलने खुलासा केला आहे.

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार

बॉलिवूडमध्ये एक सुपर क्यूट आणि आदर्श जोडी म्हणून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाकडे पाहिले जाते. अक्षय बॉलिवूडचा सुपरस्टार आहे तर ट्विंकल खन्ना एक निर्माती आणि लेखीका. त्या दोघांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव आरव आहे तर मुलीचे नाव नितारा. पण तुम्हाला माहित आहे का आरवच्या जन्मानंतर ट्विंकल खन्नाने दुसऱ्या मुलासाठी अक्षयला एक अट घातली होती. ती ऐकून बॉलिवूडचा खिलाडी हैराण झाला होता. कोणती अट होती याचा खुलासा खुद्द ट्विंकलने एक मुलाखती केला होता.

एकदा ट्विंकल आणि अक्षय कुमारने करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघींनी मनसोक्त गप्पा मारल्या. दरम्यान ट्विंकल खन्नाने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. निताराच्या जन्माआधी तिने अक्षयला एक अट घातल्याचे तिने म्हटले होते.

‘मी अक्षयला म्हणाले होते की, जो पर्यंत तो सेंसिबल आणि काही दमदार चित्रपट करत नाही तोपर्यंत मी दुसऱ्या मुलाचा विचार करणार नाही’ असा खुलासा ट्विंकल खन्नाने केला. तिचे हे बोलणे ऐकून अक्षय हैराण झाला होता. त्यानंतर अक्षयने यावर वक्तव्य केले. ‘तुम्ही माझ्या भावना समजू शकता’ असे अक्षय म्हणाला.

अक्षयने त्यावेळी त्याच्या बॉलिवूडमधील यशस्वी करिअरमध्ये ट्विंकल खन्नाचा मोठा हात असल्याचे म्हटले. करणच्या या शोमध्ये अक्षय आणि ट्विंकलचा मजेशीर अंदाज पाहायला मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 12:48 pm

Web Title: akshay kumar wife twinkle khanna condition for second child avb 95
Next Stories
1 भावा-बहिणाचा डान्स करतानाचा मजेशीर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली..
2 शबाना आझमीचा नवा चित्रपट? शेअर केला फोटो; चाहत्यांमध्ये भूमिकेबद्दल उत्सुकता
3 जेव्हा दोन खान एकत्र ताल धरतात; पाहा शाहरुख -सलमानचा अफलातून डान्स
Just Now!
X