News Flash

“अल्लू अर्जुनची सगळीकडे हवा”; सलमान खानने गाणं कॉपी केल्याने चाहते नाराज

'सीटीमार' गाण्यामुळे सलमान ट्रोल

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला अनेक चाहत्यांची पसंती मिळतेय. या ट्रेलरमध्ये सीटीमार गाण्यावर सलमान थिरकताना दिसतोय. मात्र काही चाहत्यांनी सलमानने पूर्णपणे अल्लू अर्जुनला कॉपी केल्याचं म्हंटलं आहे.

सलमान खानचा ‘राधे’ हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या 2017 सालात आलेल्या ‘दुवदा जगन्नाधम’ या सिनेमाचा रिमेक आहे. अल्लू अर्जुनच्या या सिनेमाला चाहत्यांनी मोठी पंसती दिली होती. या सिनेमातही ‘सीटीमार’ हे गाणं असून ते प्रचंड हिट ठरलं होतं. या गाण्यात अल्लू अर्जुनने जबरदस्त डान्स करत धुमाकुळ घातला होता. सलमान खाननेदेखील या सिनेमाच्या रिमेकमध्ये अल्लू अर्जुनप्रमाणे डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना मात्र सलमानचा डान्स फारसा आवडलेला नाही. ” आमचा स्टायलीश स्टार अल्लू अर्जुनची सगळीकडे हवा” अशा आशयाचे अनेक ट्विट चाहत्यांनी केले आहेत.

अल्लू अर्जुनच्या ‘डी जे’ सिनेमातील ‘सीटीमार’ गाणं राधेच्या रिमेकमध्ये पाहायला मिळाल्याने एका युजरने कमेंट करत म्हंटलं आहे, ” बॉलिवूड आता गाणीदेखील कॉपी करायला लागले. ग्रेट जॉब.” अशी कमेंट त्याने केलीय. तर अनेकांनी ‘डी जे’ सिनेमातील गाणं कॉपी केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

एका वृत्तानुसार राधे सिनेमाचं हे गाणं कंमोज करण्यासाठी संगीत दिग्दर्शक साजीद-वाजीद यांच्या जोडीने देवी श्री प्रसाद यांची भेट घेतली होती. साऊथचे कंपोजर देवी श्री प्रसाद यांनी या आधी सलमानच्या ‘रेडी’ सिनेमातील ‘ढिंका चिका’ हे गाणं कंपोज केलं होतं. साउथच्या ‘आर्या’ सिनेमातील ‘रिंगा रिंगा’ या सिनेमातील गाण्यावरून ‘ढिंका चिका’ कंपोज करण्यात आलं होतं.

वाचा: सनी लिओनीच्या मुलीला पाहून नेटकरी म्हणाले; “लहान असून निशा किती…”

या चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, प्रवीण तरडे आणि अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले आहे. हा चित्रपट १३ मे रोजी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर, करोनाचे निर्बंध लागु असणाऱ्या ठिकाणी हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल . एवढंच नाही तर चित्रपट ४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 7:22 pm

Web Title: allu arjun fan disappoint as salman copy seetimar song for radhe from dj movie kpw 89
Next Stories
1 ‘दयाबेन’ हॉलिवूड चित्रपटामध्ये? पाहा मजेशीर व्हिडीओ
2 करोनामुळे दिलीप कुमारांच्या भाच्याला मिळेना काम
3 टिकटॉक स्टारला बलात्कार प्रकरणात अटक, अल्पवयीन पीडित मुलगी आहे चार महिन्यांची गर्भवती
Just Now!
X