News Flash

सईला करायचं आहे कथ्थकमध्ये करिअर

मालिका एका नव्या वळणावर..

प्रेक्षकांचं निस्सीम प्रेम आणि पाठिंब्यामुळे झी युवा वाहिनीवरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या लोकप्रिय मालिकेने ४०० भागांचा टप्पा गाठला. मराठी संस्कृती आणि परंपरा अगदी मनापासून जपणारे अप्पा केतकर आणि ऑस्ट्रेलियामधून आलेला नचिकेत यांच्यातील नोकझोक प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली. मालिकेत नचिकेतची आई इरा देशपांडे म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठेची एंट्री झाल्यापासून मालिकेने वेगळंच वळण घेतलं आहे. अप्पा आणि इराने तर सई आणि नचिकेतचं लग्न मोडण्यासाठी आता हातमिळवणी केली आहे.

पण दुसरीकडे सई आणि नचिकेत यांच्यातील समंजसपणा आणि प्रेम यामुळे त्यांच्यात खटके उडत नाही आहेत. उलट नचिकेत सईला तिच्या आवडीचं काम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. सई कथ्थकच प्रशिक्षण घेत असल्यापासून सईला त्यातच पुढे काही तरी करण्याची इच्छा आहे.

आपल्यातील कला दुसऱ्यांना शिकवून आपली भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला देण्याची इच्छा सई नचिकेतसमोर बोलून दाखवते. नचिकेत देखील तिला या गोष्टीसाठी पाठिंबा देतो. त्यामुळे सईला खूपच आनंद होतो पण दुसरीकडे अप्पा आणि इरा त्या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सई आणि नचिकेतमध्ये खटके उडतील का? अप्पा आणि इराच्या प्रयत्नांना यश येईल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 4:12 pm

Web Title: almost sufal sampurnam serial update avb 95 4
Next Stories
1 बूटी शेक काय आहे? आशा भोसलेंची नक्कल करत जॅमीने उडवली टोनीची खिल्ली
2 “फाटकी जीन्स घालायची असेल तर…”, जीन्सच्या वादात कंगनाची उडी
3 लग्नाच्या ७ वर्षांनंतर ‘दंगल’ फेम अभिनेता होणार बाबा
Just Now!
X