सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या घटना रोजच होताना पाहायला मिळतात. त्यातच सेलिब्रिटींच्या बाबतीत या घटना अनेकदा होतच असतात. एखादा फोटो असो किंवा पोस्ट, बऱ्याचदा नेटकरी सेलिब्रिटींवर टीकाटिप्पणी करत असतात. प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, फातिमा सना शेख, बिपाशा बासू यांच्यानंतर आता अभिनेत्री अमिषा पटेल ट्रोल झाली आहे. ट्विटरवर तिने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे तिला टीकेचा सामना करावा लागत आहे.
अमिषाने ट्विटरवर काळ्या ड्रेसमधील एक फोटो पोस्ट केला आहे. तोकड्या कपड्यातील तिचा हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नसल्याचं दिसून येत आहे. ट्विपल्सनी तिच्या फोटोवर आक्षेपार्ह आणि अश्लील प्रतिक्रिया दिल्या, तर एकाने तिला पॉर्नस्टार होण्याचाही सल्ला दिला.
PHOTO : या हॉट अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार अजय
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अमिषाला फारसे यश मिळाले नाही. २०१३ मध्ये ‘शॉर्टकट रोमियो’ या चित्रपटात ती दिसली होती. त्यानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. पण सोशल मीडिया असो किंवा कोणतेही कार्यक्रम, पार्ट्या या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2018 5:34 pm