News Flash

इरा नव्हे तर हे आहे आमिरच्या लेकीचं खरं नाव; “चुकीचं नाव उच्चारल्यास ५ हजार दंड”

इराने सांगितलं तिचं खरं नाव

आमिर खानची लेक जिला आपण सगळेच इरा म्हणून ओळखतो ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मात्र सध्या ती त्रस्त आहे ते म्हणजे तिच्या नावामुळे. होय आमिरच्या लेकीने मीडिया आणि सगळेच तिचं नाव चुकीचं उच्चारत असल्याचं म्हंटलं आहे. त्यामुळे एक व्हिडीओ पोस्ट करत तिने तिचं खरं नाव काय हे सांगितलं आहे.

आमिरच्या मुलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने म्हंटलं आहे की मीडियामध्ये आणि इतर अनेकजण माझं नाव इरा म्हणत असल्याने माझ्या मैत्रिणींनी मला प्रचंड त्रास दिला आहे. पण माझं नाव इरा नसून ते आयरा आहे. तिने तिचं नाव कसं उच्चारावं हे या व्हिडीओत सांगितलं आहे. ती म्हणाली, ” माझं नाव ईरा नाही तर eye-ra म्हणजेच आयरा आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

पुढे ती म्हणाली, ” जो कुणी माझं नाव यापुढे चुकीचं उच्चारेल त्याला ५ हजार रुपये द्यावे लागतील. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी मी ते दान करेन.”असं ती म्हणाली. कॅप्शनमध्ये आयरा म्हणाली आहे. ” ira. eye-ra.Nothing Else.  म्हणजेच इरा. आयरा. आणखी काही नाही.”

अखेर कपिल शर्माने बाळचं नाव सांगितलं; मुलाचं नाव आहे…

काही दिवसांपूर्वीच आयराने तिला डिप्रेशनचा सामना करावा लागल्याचं सांगितलं होतं. शिवाय यानंतर आयराने मानसिक स्वास्थासाठी काम करायला सुरुवात केली आहे. यासाठी तिला 25 इनर्टनची गरज असल्याचंही तिने ,सोशल मीडियावरून सांगितलं होत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 11:29 am

Web Title: amir khan daughter teaches how to pronouns her name which is actually eye ra kpw 89
Next Stories
1 करोनाची लागण झाल्यानंतर अक्षय कुमार रुग्णालयात दाखल, चाहत्यांना म्हणाला…
2 शाहिद कपूरची पत्नी मीराचा बोल्ड लूक; स्विमिंग सूटला कोल्हापुरी चप्पलेची जोड
3 ‘राम सेतु’च्या सेटवर करोनाचा उद्रेक; अक्षय कुमारनंतर 45 जणांना करोनाची लागण
Just Now!
X