04 June 2020

News Flash

अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्वात जादूई आकर्षण – बिपाशा बासू

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन या वयातदेखील कमालीचे आकर्षक दिसत असल्याचे मत अभिनेत्री बिपाशा बासू हिने व्यक्त केले आहे.

| January 9, 2015 01:09 am

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन या वयातदेखील कमालीचे आकर्षक दिसत असल्याचे मत अभिनेत्री बिपाशा बासू हिने व्यक्त केले आहे. ‘अलोन’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली, अमिताभ बच्चन यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व सर्वांना भूरळ घालते. बच्चन यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचे जादूई आकर्षण आहे. या असामान्य व्यक्तिमत्वाचे किमान दहा टक्के गुण तरी तरूण अभिनेत्यांनी आत्मसात करावेत. बिपाशाला फिटनेसची आवड असल्याचे सर्वश्रूत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना तिने अॅक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची इच्छाही व्यक्त केली. अॅक्शन चित्रपटात अभिनेत्रींना फार काही वाव नसल्याची खंत तिने तिने व्यक्त केली. त्यामुळे अॅक्शन चित्रपटात अभिनेत्रींचा मुख्य भूमिकेसाठी विचार करण्याचाही आग्रह तिेने धरला.
‘अलोन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा अभिनेता करण सिंग ग्रोव्हरदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. मनोरंजनाच्या क्षेत्रात गेली दहा वर्षे असलो, तरी बिपाशाबरोबर उत्कट दृश्ये साकारणे सुरुवातील खूप कठीण गेल्याची कबूली त्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2015 1:09 am

Web Title: amitabh bachchan is extremely hot and sexy even at 72 bipasha basu
Next Stories
1 पाहा ‘रॉय’ चित्रपटातील जॅकलिनचा पंजाबी गाण्यावर ठेका
2 सोनाक्षी-अर्जुनचा ‘तेवर’ पाहण्याची पाच कारणे
3 रजा वाढविण्याच्या अर्जावर निकाल येईपर्यंत संजूबाबाला तुरूंगाबाहेर राहण्याची मुभा
Just Now!
X