News Flash

हटके फोटो शेअर करत अमिताभ यांनी दिला मास्क घालण्याचा सल्ला

पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अमिताभ फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनेकवेळा ते त्यांच मत मांडताना दिसतात. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता करोनापासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी अमिताभ यांनी चाहत्यांना काय करायला पाहिजे हे सांगितले आहे. अमिताभ यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. अमिताभ यांचा हा फोटो एडिटेड आहे. त्यांनी मास्क परिधान केला आहे. “अनुशासन , प्रार्थना … उद्धार !”, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी हा फोटो शेअर करत दिले आहे. अमिताभ यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

दरम्यान, अमिताभ यांच्या ‘चेहरे’ चित्रपटाचे प्रदर्शन वाढत्या करोनाच्या संक्रमणामुळे लागु करण्या आलेल्या निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी, क्रिस्टल डिसूझा, अन्नू कपूर, सिद्धांत कपूर, धृतिमान चॅटर्जी आणि रघुबीर यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर, दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंडन्ना आणि नीना गुप्ता यांच्यासोबत ते ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसणार आहेत. यानंतर ते ‘द इंटर्न’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 11:12 am

Web Title: amitabh bachchan shares his edited picture and urges everyone to wear a mask as covid 19 dcp 98
Next Stories
1 ‘म्हणून मुलींवर बलात्कार होतात’, कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीने दिले उत्तर म्हणाली…
2 युजरच्या ‘त्या’ कमेंटवर तापसी पन्नू भडकली; “मूर्खपणा कमी करा”
3 अभिनेत्री हिना खानला करोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन
Just Now!
X