‘मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार’ अशी ज्यांची ओळख आहे त्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर आधारित चरित्रपट येत आहे. या चरित्रपटात काशिनाथ यांची भूमिका साकारली आहे ती अभिनेता सुबोध भावे यानं. ही भूमिका साकारणं आपल्या कारकिर्दीतील सर्वात अवघड गोष्ट होती हे सुबोधनं देखील मान्य केलं आहे. विशेष म्हणजे ही भूमिका साकारताना आपण कोणताही अभ्यास केला नाही असंही सुबोध ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना म्हणाला.

सुबोधनं काशिनाथ घाणेकर यांची नाटकं कधीही पाहिली नव्हती, त्यामुळे या भूमिकेविषयी अधिक समजून घेताना त्यांनं वाचायला सुरूवात केली. त्यांचे सिनेमे पाहायला सुरूवात केली मात्र हा प्रयोग त्यानं अर्धवट सोडला. या मागचं कारणंही सुबोधनं सांगितलं, ते कारण काय होतं हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की पाहा हा व्हिडिओ..

 

अभिजित देशपांडे दिग्दर्शित हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध व्यतिरिक्त सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, प्रसाद ओक हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहे.