News Flash

करोनाविरोधात बुद्धिबळाच्या पटावर गायक अरिजीत सिंह; विश्वनाथन आनंदसोबत रंगणार सामना

येत्या १३ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका ​व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये गायक अरिजीत सिंह विरूद्ध विश्वनाथन आनंद असा सामना रंगणार आहे.

नेहमीच आपल्या सुरांवर चाहत्यांना झुलवणारा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंह लवकरच आता बुद्धिबळाच्या पटावर सुद्धा दिसून येणार आहे. येत्या १३ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका ​व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये गायक अरिजीत सिंह विरूद्ध विश्वनाथन आनंद असा सामना रंगणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी हा इव्हेंट घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.

चेस डॉट कॉम इंडिया, ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि अक्षय पात्र यांनी एकत्र येऊन या चॅरिटी मॅचचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यात त्यांनी लिहिलंय, “ज्याने आपल्या आवाजाने लाखो मनं जिंकली आहेत..होय आम्ही अरिजीत सिंहबद्दल बोलतोय…लवकरच तो एका बुद्धिबळाच्या सामन्यात विश्वनाथन आनंद विरूद्ध खेळताना दिसणार आहे. भेटूया येत्या १३ जून रोजी आमच्या यूट्यूब चॅनलवर सायंकाळी ५-८ वाजता.” सोबतच या ट्विटमध्ये करोना पिडीत कुटुंबियांना मदत करण्यासाठी एक लिंक देखील शेअर केलेली आहे.

करोना काळात गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी तसंच त्यांना अन्न वाटप करण्यासाठी गायक अरिजीत सिंहने पुढाकार घेतलाय. त्याच्यासोबत अभिनेता आमिर खान, प्रोड्यूसर साजिद नाडियादवाल हे देखील या सामन्यात खेळताना दिसणार आहेत.

यूट्यूबवर होणार टेलीकास्ट

चेस डॉट कॉमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, “ज्या क्षणांची तुम्ही वाट पाहत आहात तो क्षण आलाय…अभिनेता आमिर खान वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदच्या विरोधात चॅरिटी मॅच खेळणार आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी भरभरून मदत करा. ही मॅच येत्या १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता यूट्यूबवर टेलीकास्ट होणार आहे.”

मदतीसाठी कायम पुढे असतो अरिजीत

गेल्याच महिन्यात गायक अरिजीत सिंहने करोनामुळे त्याच्या आईला गमावलं आहे. त्यानंतर करोना काळात इतर गरजू कुटूंबाच्या मदतीसाठी त्याने एक हात पुढे केलाय. काही दिवसांपूर्वीच अरिजीतने करोना काळात ग्रामिण भागातील करोनाबाधितांच्या मदतीसाठी लाईव्ह कॉन्सर्ट केलं होतं. त्याने त्याच्या फेसबूक अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली होती. यातून जमा होणारा निधी हा ग्रामिण भागातील रूग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन सारख्या टेस्टिंग मशीन्स खरेदी करण्यासाठी तसंच इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येणार, असं देखील अरिजीतने सांगितलं होतं.

गायक अरिजीत सिंह हा मुळचा पश्चिम बंगलच्या मुर्शिदाबाद इथला राहणारा आहे. करोना काळात त्याच्या मुर्शिदाबाद गावातील करोनाबाधितांना देखील त्याने मदत केली आहे. मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये त्याने काही ऑक्सिजन थिअरपी मशिन्स दान केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 3:04 pm

Web Title: arijit singh will play chess with champion vishwanathan anand for covid 19 fundraise prp 93
Next Stories
1 शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, ‘अग्गबाई सूनबाई’मध्ये नवे वळण
2 म्यानमारहून भारतात पायी चालत आल्या होत्या हेलन; ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता खुलासा
3 ‘कधी विचारही केला नव्हता…’, रस्त्यातच उतरलेल्या विमानाचा व्हिडीओ शेअर करत प्रीति म्हणाली
Just Now!
X