भावगीते, भक्तिगीते, नाटक, चित्रपट आणि जाहिरातींसाठी विविध माध्यमांमधून अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे. या संगीत क्षेत्रातील विविध प्रकारांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी अलिकडेच लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी वादक ते संगीतकार हा प्रवास नेमका कसा सुरु झाला ते सांगितलं.
राष्ट्रीय एकात्मता प्रकट करणाऱ्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताचे संगीतकार म्हणूनही अशोक पत्की यांची ओळख आहे. ‘झंडू बाम’ आणि ‘धारा’सह विविध उत्पादनांच्या जाहिरात गीतांना पत्की यांनी संगीतबद्ध केलं आहे.