अभिनेता अतुल कुलकर्णीला विनोदी शैलीचं अभिनय करताना फार क्वचित प्रेक्षकांनी पाहिलं असेल. सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ‘सँडविच फॉरेव्हर’ या ओरिजिनल सीरिजमध्ये त्यांच्या अभिनयाची ही बाजू पाहायला मिळणार आहे. यामध्ये तो निवृत्त रॉ एजंट व नैनाचे (आहाना कुमरा) वडील व्ही. के. सरनाईक यांची भूमिका साकारत आहे.
आपल्या जावईला (कुणाल रॉय कपूर) शिस्तबद्ध बनवण्याचा त्यांचा हेतू असतो आणि त्यांच्या मते तो बॅडमिंटन खेळाडू असलेल्या त्यांच्या मुलीसाठी योग्य जोडीदार नसतो. वडील म्हणून अतुलच्या भूमिकेचं एक वेगळं पैलू यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्याचसोबत त्याची विनोदी शैली प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडेल यात काही शंका नाही.
या भूमिकेबद्दल अतुल म्हणाला, ”एक कलाकार म्हणून मी माझ्या कम्फर्ट झोनपलीकडील भूमिका साकारण्याला प्राधान्य देतो. या भूमिकेने मला मुख्य कन्टेन्टमध्ये कधीच न मिळालेली शैली साकारण्याची संधी दिली. माझ्या मर्यादांपलीकडील विविध पैलू शोधण्यामध्ये मदत करणा-या भूमिका मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो.” रोहन सिप्पी दिग्दर्शित ‘सँडविच फॉरेव्हर’ या सीरिजची कथा एका तरूण विवाहित जोडप्याच्या भोवती फिरते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 27, 2020 5:18 pm