24 February 2021

News Flash

लतादीदी पडल्या ‘अंधाधून’च्या प्रेमात

ट्विट करत आयुषमानचं केलं कौतुक

अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘अंधाधून’ हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला. समीक्षकांनीही चित्रपटाची आणि त्यातील आयुषमानच्या अभिनयाची स्तुती केली. आता भारताची गानकोकीळा अर्थात लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आयुषमानवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी नुकताच हा चित्रपट बघितला आहे.

आयुषमानच्या अभिनयाचं कौतुक करत लतादीदींनी लिहिलं, “आयुषमानजी नमस्कार. मी तुमचा अंधाधून हा चित्रपट आज पाहिला. तुम्ही खूप चांगलं काम केलंय आणि जी गाणी तुम्ही गायली आहेत, तीसुद्धा मला फार आवडली. माझ्याकडून तुम्हाला फार शुभेच्छा आणि भविष्यातही तुम्हाला यश मिळो अशी प्रार्थना करते.” लतादीदींचे आभार मानत आयुषमानने ट्विटरवर लिहिलं, “तुमचे हे शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्याकडून मिळणाऱ्या या प्रोत्साहनपर शब्दांसाठीच कदाचित मी मेहनत घेतली होती. आशिर्वादासाठी धन्यवाद.”

एकमेकांत अडकलेल्या चित्रविचित्र प्रश्नांची मालिका श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर मांडली होती. एकापाठोपाठ एक शब्दश: अंदाधुंद कारभार वाटावा अशा घटना या चित्रपटात घडतात आणि त्याचा शेवट मात्र प्रेक्षकाला कोड्यात टाकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 3:30 pm

Web Title: ayushmann khurrana gets appreciated by lata mangeshkar for his performance in andhadhun ssv 92
Next Stories
1 अजिंक्य देवचं चार वर्षांनंतर मराठीत पुनरागमन
2 शाहरुख खानच्या सासूबाई अडचणीत; भरावा लागेल तीन कोटींचा दंड
3 ‘बिग बॉस १३’ फेम पारस-माहिराने केलं लग्न? पाहा फोटो
Just Now!
X