News Flash

Video: ‘बेवॉच’च्या ट्रेलरमध्ये प्रियांकाचे ओझरते दर्शन

ट्रेलरनंतर 'पिक्चर अभी बाकी है...' हा डायलॉगच देसी गर्लच्या चाहत्यांना दिलासा देणारा ठरेल.

‘बेवॉच’च्या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा अगदी काही क्षणांचे दर्शन देताना दिसते.

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित ‘बेवॉच’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गेल्या बर्‍याच महिन्यांपासून चर्चा सुरू होती. प्रियांकाला पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बेवॉच’ हॉलिवूडपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांका अवघ्या काही सेकंदांसाठी दिसली आहे. त्यामुळे हा ट्रेलर प्रियांकाच्या चाहत्यांची निराशा करणारा असा आहे.

पुढच्या वर्षी २६ मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘बेवॉच’ हा चित्रपट, याच नावाच्या गाजलेल्या टीव्ही मालिकेवर आधारित आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूड चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. ड्वेन जॉन्सन ‘द रॉक’ मुख भूमिकेत असून झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारत असून तिचे हॅलोविन स्वरूपातील पोस्टर यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र सध्या समोर आलेल्या ट्रेलरमध्ये तिची झलक काही सेंकदापूर्ती दिसल्याने ‘पिक्चर अभी बाकी है…’ हा डायलॉगच देसी गर्लच्या चाहत्यांना दिलासा देणारा ठरेल.

बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ ते हॉलीवूडची ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्राने हॉलीवूड अभिनेता ड्वाइन जॉन्सन अर्थात ‘द रॉक’ सोबतच्या ‘बेवॉच’ या आगामी हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. यामधील प्रियांकाचा फर्स्ट लूकची काही छायाचित्रे देखील व्हायरल झाली होती.  काही दिवसांपूर्वी प्रियांकाने ‘क्वांटिको’ या अमेरिकन टेलिव्हिजनवरील मालिकेसाठी मानाचा ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पटकावला होता. अमेरिकेतील ‘क्वांटिको’ टीव्ही मालिकेतील एफबीआय एजंटच्या भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पुरस्कार पटकावणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली होती. प्रियांकाने इमा रॉबर्ट्स, जॅमी ली कर्टिस, ली मिशेल आणि मार्सिया गे हार्डेन यांसारख्या मातब्बर अभिनेत्रींना मागे टाकत या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. प्रियांकाने मिळविलेली ही उपलब्धता तिच्या आगामी चित्रपटासाठी फायदेशीर ठरली. मात्र ‘बेवॉच’च्या  ट्रेलमध्ये प्रियांकाकडे दुर्लक्षित झाल्याचे दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 3:21 pm

Web Title: baywatch trailer priyanka chopra gets just a second but what a second that is watch video
Next Stories
1 ‘दंगल’पूर्वी घाबरलाय आमिर
2 VIDEO: ‘स्पायडर मॅन होमकमिंग’चा ट्रेलर प्रदर्शित
3 नशेत धुंद असलेल्या मलायकाने केला सोनमचा अपमान
Just Now!
X