29 September 2020

News Flash

शिल्पा शिंदेला बलात्काराच्या धमक्या

शिल्पाचे चाहतेसुद्धा तिच्यावर नाराज असून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

शिल्पा शिंदे

भाभीजी घर पर है फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेला काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पाठराखण करणे महागात पडले आहे. पुलवामा दहशतवाद हल्ल्यासंदर्भात नवज्योत सिंग सिद्धूंनी केलेल्या वक्तव्याचे शिल्पाने समर्थन केले आणि त्यामुळेच ती सध्या ट्रोलची शिकार झाली आहे. शिल्पाचे चाहतेसुद्धा तिच्या या भूमिकेमुळे नाराज असून सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. इतकेच नव्हे तर तिला बलात्काराच्या धमक्याही येऊ लागल्या आहेत.

पुलवाम्यात दहशतवादांच्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बोलून तोडगा काढण्याचे वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धूंनी केले होते. त्यांनाही हे वक्तव्य चांगलेच भोवले होते. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत शिल्पा म्हणाली होती, ‘काही दहशतवाद्यांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणे योग्य नाही. प्रत्येक देशाच्या काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतात. त्या देशावर आरोप करण्यापेक्षा आपण दहशतवादाला थांबवणे गरजेचे आहे.’ शिल्पाच्या या वक्तव्यावर नेटकरी भडकले आहेत. शिल्पा शिंदेने काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे तिने नवज्योत सिंग सिद्धूंचे समर्थन करणे साहजिक आहे असेही मत काहींनी व्यक्त केले.

‘बलात्काराच्या धमक्यांना घाबरून मी घरी बसणार नाही. ज्यांना जे म्हणायचे आहे, करायचे आहे त्यांनी ते म्हणावे आणि करावे. पण या गोष्टीवर नक्कीच सर्वांनी विचार करायला पाहिजे की या देशातील महिला किती सुरक्षित आहेत?’, अशी प्रतिक्रिया शिल्पाने दिली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधूनही सिद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 10:03 am

Web Title: bhabhi ji ghar par hai fame actress shilpa shinde gets rape threats for backing navjot singh sidhu statements
Next Stories
1 तो विश्वासघातकी नव्हता, नेहानं केली हिमांशची पाठराखण
2 शहीद भाई कोतवाल’ मध्ये ‘ही मर्दाची कथा’
3 Surgical Strike 2: जय हो ! सलमानकडून भारतीय हवाई दलाला सलाम
Just Now!
X