News Flash

अमिताभ बच्चन यांनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस; ‘या’ कारणासाठी चाहत्यांची मागितली माफी

सोशल मीडियावर शेअर केला फोटो

देशात करोनाचा कहर वाढत असतानाच सरकारकडून लसीकरणावर लक्ष केंद्रित केलं जातं आहे. गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत या सेलिब्रिटींनी चाहत्यांना लस घेण्याचं आवाहन केलं. यातच बीग बी अमिताभ बच्च्न यांनी नुकताच करोना लसीचा दुसार डोस घेतला आहे.

बिग बींनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत करोना लसीचा दुसरा डोस घेतल्य़ाची माहिती चाहत्यांना दिली. यावेळी मात्र त्यांनी एका कारणासाठी चाहत्यांची माफीदेखील मागितली. एप्रिल महिन्यात बिग बींनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आता शनिवारी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत बिग बींनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्याच सांगितलं यावेळी कॅप्शनमध्ये ते म्हणाले, “दुसराही झाला.. कोव्हिड वाला.. क्रिकेटवाला नाही…सॉरी सॉरी हे खूपच वाईट होतं.” हसं मजेशीर कॅप्शन देत त्यांनी सोबतच काही हसण्याचे इमोजी दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

एप्रिल महिन्यात बिग बींनी लसीचा पहिला डोस घेतला होता. यावेळीदेखील सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यात ते म्हणाले होते, “झालं. आज दुपारी मी करोनाची लस घेतली. सर्व काही ठीक आहे.” असं म्हणत त्यांनी माहिती दिली.

दरम्यान अमिताभ यांनी करोनाकाळात कोणाला मदत केली नाही अशी टीका करणाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच बिग बींनी सडेतोड उत्तर दिलं होतं. एक ब्लॉग शेअर करत अमिताभ बच्चन यांनी केलेल्या मदत कार्याची संपूर्ण यादीच समोर मांडली आणि टीकाकारांची बोलती बंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 8:45 am

Web Title: big b amitabh bachchan take covid vaccine second dose share photo and said soory it was bad kpw 89
Next Stories
1 नाट्यकर्मींचे दशावतार
2 मनोरंजनाला तिलांजली
3 निर्बंधातही ‘धमाकेदार’
Just Now!
X