News Flash

राहुल वैद्यचं फेसबुक अकाऊंट हॅक ; ‘ते’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले

सोशल मीडियावरून राहूलने माहिती दिली

बिग बॉस फेम गायक राहुल वैद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. सोशल मीडियावर राहुलचा मोठा चाहता वर्ग आहे. तसचं बिग बॉसमुळे राहुलच्या लोकप्रियतेत वाढ झालीय. राहुल आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा परमार यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील चांगल्याच रंगताना दिसतात. सोशल मीडियावर राहुल त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करतो.

मात्र अशातच आता राहुल वैद्यचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. राहुलच्या फेसबुक अकाऊंटवरून काही विचित्र व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. त्यामुळे त्याचे चाहते देखील हैराण झाले. यानंतर राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. राहुल या पोस्टमध्ये म्हणालाय, ” माझं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. हॅकरकडून पोस्ट केल्या जाणाऱ्या व्हिडीओंकडे दूर्लक्ष करा. लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.”

rahul-vaidya-

गेल्या काही तासांपासून राहूल वैद्यच्या फेसबुक अकाऊंटवरून अनेक विनोदी आणि विचित्र व्हिडीओ शेअर केले जात आहेत. हॅकरकडू हे व्हिडीओ पोस्ट केल्याचं म्हंटलं जातंय. या व्हिडीओच्या कमेंटमध्ये राहुलच्या अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. हे व्हिडीओ शेअर करणं थांबव अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. तर अनेक युजरने ‘तुला कामधंदा नाही का? का त्याचं अकाऊंट हॅ केलं?’ असं म्हणत संताप व्यक्त केलाय.

वाचा: “माझ्या देशासाठी ‘हा’ प्रश्न विचारत रहा”; चेतन भगतचं ट्विट चर्चेत

राहुल लवकरच खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. तर नुकतच राहुलचं गाणं ‘मधानिया’ रिलीज झालं असून चाहत्यांची या गाण्याला चांगलीच पसंती मिळतेय. या गाण्यात राहुलसोबतच त्याची गर्लफ्रेण्ड दिशा झळकतेय. दोघांच्या जोडी या गाण्यात चांगलीच उठून दिसतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 2:20 pm

Web Title: big boss fame rahul vaidya facebook account hacked hacker share funny video kpw 89
Next Stories
1 Video: ‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ; शूटिंग ठप्प
2 …म्हणून सलमानने ‘राधे’ला मल्टीपल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा घेतला निर्णय
3 “माझ्या देशासाठी ‘हा’ प्रश्न विचारत रहा”; चेतन भगतचं ट्विट चर्चेत
Just Now!
X