News Flash

ठरलं हो ठरलं! रणवीर दीपिकाचं लग्न ‘या’ तारखेला

डेस्टिनेशन वेडिंगच्या थाटात हा विवाहसोहळा पार पडेल ज्यानंतर बंगळुरु आणि मुंबईत त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही कळत आहे.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, ranveer deepika

actress Deepika Padukone and actor Ranveer Singh . अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता ‘रणवीर सिंग गोलियों की रासलीला- राम लीला’ या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकले होते. ज्यानंतर या जोडीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्यात मैत्रीचं नातं खुलून आलं आणि त्यानंतर याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास पाच वर्षांपासून हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात असून, त्यांच्या रिलेशनशिपविषयीची प्रत्येक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून जातं.

खुद्द रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या नात्याविषयी कधीच खुलेपणाने भाष्य केलं नसलं तरीही त्यांच्या नात्यात असणारा सहजपणा आणि एकमेकांना असणारी साथ पाहता ही जोडी अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टमध्येही अग्रस्थानी आहे. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०१८ च्या सुरुवातीपासून रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. मुख्य म्हणजे या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे लग्नबंधनात अडकतील, असंच अनेकांना वाटत आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या लग्नाविषयीच एक आनंदाची माहिती समोर आली आहे.

‘फिल्मफेअर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नोव्हेंबर महिन्याच्या १० तारखेला ते लग्नगाठ बांधतील. लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच रणवीर आणि दीपिकाने सर्वाधिक वेळ घेतला. आपल्या लग्नात सर्व गोष्टींचं नियोजन अगदी सुरेख पद्धतीने व्हावं असाच त्यांचा अट्टहास आहे. त्यामुळे या दोघांच्यागी वेळापत्रकांनुसार १० नोव्हेंबर हीच तारीख सोयीची असल्यामुळे त्याच दिवशी त्यांचा विवाहसोहळा पार पडेल असं, म्हटलं जात आहे. किंबहुना त्यांच्या लग्नाआधी रोका झाला असून, आता काही दिवसांपूर्वीच लग्नाची अंतिम तारीख ठरवण्यात आल्याचं कळत आहे.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

बॉलिवूडच्या या ‘बाजीराव- मस्तानी’च्या लग्नसोहळ्याविषयी आता चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. डेस्टिनेशन वेडिंगच्या थाटात हा विवाहसोहळा पार पडेल ज्यानंतर बंगळुरु आणि मुंबईत त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही कळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 12:12 pm

Web Title: bollywood actress deepika padukone and actor ranveer singh to tie the knot on 10th november details
Next Stories
1 कतरिनामुळेच रणबीरच्या करिअरचे वाजले तीनतेरा?
2 #InternationalYogaDay2018 : योगाभ्यासामुळे जीवनात आमूलाग्र बदल- अमृता खानविलकर
3 आयेशा टाकियाच्या पतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा
Just Now!
X