News Flash

घराबाहेर लोकांना सरबत देताना दिसला सोनू सूद ; राखी सावंतच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया

फोटोग्राफर्स आणि इतर लोकांसाठी घेऊन आला सरबत

करोना काळात गरीबांसाठी ‘मसिहॉं’ बनलेला अभिनेता सोनू सूद लागोपाठ लोकांच्या मदतीला धावून येतोय. अभिनेता सोनू सूदला जितकं शक्य होतंय, तितकं तो त्याच्या परीने लोकांना मदत करताना दिसून येतोय. याशिवाय त्याच्या घरी मदतीसाठी जे जे येत आहेत त्यांच्या सेवेतही तो लागोपाठ धडपड करतोय. त्याच्या घरी येणाऱ्या माध्यमकर्मींना आणि इतर जणांना तो सरबत देताना दिसून आलाय.

अभिनेता सोनू सूदच्या बिल्डिंगखाली लोकांची गर्दी झाली होती आणि भर उन्हाच्या तडाख्यात सर्व लोक उभे असल्याचं सोनू सूदने पाहिलं. हे पाहून सोनू सूदला रहावलं नाही आणि तळपत्या उन्हात दिलासा देण्यासाठी तो बिल्डिंगखाली आला. बिल्डिंगखाली उभे असलेले अनेक मीडियाकर्मी आणि इतर मंडळींना त्याने स्वतःच्या हाताने सरबत दिलं. यावेळी त्याने लोकांसोबत चर्चा करून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देखील दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदचे अनेक चाहते त्याने राजकारणात यावे अशी इच्छा व्यक्त करताना दिसून आले. त्यात राखी सावंतने ही सोनू सूदला प्रधानमंत्री करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यावर सोनू सूदला त्याच्या प्रतिक्रियेबाबत विचारले असता त्याने उत्तर दिलं. यावेळी सोनू सूद म्हणाला, ” जो तो ज्याच्या त्याच्या जागेवरच बरा आहे…मी सामान्य माणूसच बरा आहे… निदान तुमच्यासोबत उभा तरी राहू शकतो…”.

नुकताच राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आलाय. यात राखीने अभिनेता सलमान खान, सोनू सूद आणि अमिताभ बच्चन यांचं कौतूक करताना दिसून आली. सोबतच ती या तिघांना खरे हिरो असं देखील म्हणाली. या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणाली, ” मी तर म्हणेल, सोनू सूदला देशाचा पंतप्रधान करा…सलमान खानला बघा, तो सुद्धा किती मदत करतोय…त्याला पंतप्रधान बनवा…मंत्री तर सध्या डिबेट करत आहेत…आम्हाला तुमचे डिबेट नकोत…आम्हाला व्हॅक्सिन हवी…आम्हाला बेड्स हवेत…आम्हाला ऑक्सिजन हवा…”, असं या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:06 pm

Web Title: bollywood sonu sood servs juice to people outside his house gives reaction on rakhi sawant prime minister statement prp 93
Next Stories
1 लवकरच भेटीला येणार ‘पवित्र रिश्ता २’ ; पुन्हा अंकिता लोखंडे बनणार अर्चना देशमुख
2 …म्हणून टॉम क्रूजने परत केले तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार
3 “बॉलिवूडमध्येही लैंगिक भेदभाव”, अभिनेत्री दिया मिर्झाचा खुलासा
Just Now!
X