28 November 2020

News Flash

KBC 12: स्पर्धकाने मुलीचे नाव ठेवण्यासाठी बिग बींकडे केली विनंती

पाहा बिग बी काय म्हणाले..

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती १२.’ माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. या शोच्या माध्यमातून चाहत्यांना बिग बींना भेटण्याची संधी मिळत आहे. शोमध्ये बिग बी त्यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से सांगताना दिसतात. हॉट सीटवर बसलेला स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये देखील मजा मस्ती सुरु असते. केबीसीच्या एका भागामध्ये तर स्पर्धकाने चक्क बिग बींना त्याच्या मुलीचे नाव ठेवण्यास सांगितले.

केबीसीमध्ये सनी खलास हे स्पर्धक म्हणून हॉट सीटवर बसले होते. त्यांनी फास्टेस्ट फिंगर फस्टमध्ये सर्वात लवकर प्रश्नांचे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी त्यांची ओळख करुन देताना पत्नी विषयी माहिती दिली.

शोमध्ये येण्याच्या एक दिवस आधी सनी आणि त्यांच्या पत्नीला कन्यारत्न झाले. त्यामुळे सनी हे अमिताभ यांना तिचे नाव ठेवण्याची विनंती करतात. त्यावर अमिताभ बच्चन यांनी सनी आणि त्यांच्या पत्नीला शुभेच्छा देत दिवाळीच्या आधी तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले असे बोलतात. सनी यांच्या खेळाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी ३ लाख २० हजार रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे गेम सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १ लाख ६० हजार रुपये जिंकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 4:52 pm

Web Title: contestant requests amitabh bachchan to suggest a name for his newborn baby avb 95
Next Stories
1 ‘नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक करा’; अभिनेत्रीचा मिलिंद सोमणला पाठिंबा
2 कतरिनाचा घायाळ करणारा ‘हा’ फोटो पाहिलात का?
3 ‘विवाह’मधल्या भूमिकेसाठी अमृता रावला द्यावी लागली होती ‘ही’ परीक्षा
Just Now!
X