24 September 2020

News Flash

‘छोटा भीम कुंफु धमाका’च्या पंजाबी गाण्यात दिसणार दलेर मेहंदी यांची मुलगी

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅनिमेटेड कॅरेक्टर छोटा भीम लवकरच चित्रपट स्वरूपात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

दलेर मेहंदी आणि त्यांची मुलगी रबाब

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅनिमेटेड कॅरेक्टर छोटा भीम लवकरच चित्रपट स्वरूपात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘छोटा भीम कुंग फु धमाका’ असे त्या चित्रपटाचे नाव असून तो थ्रीडी स्वरूपात दाखवला जाणार आहे. या चित्रपटामध्ये दुसरं तिसरं कोणी नसून, फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध पॉप गायक दलेर मेहंदी यांनी गाणं गायलं आहे.

या चित्रपटातील गाण्याबद्दल बोलताना दलेर मेहंदी म्हणतात, या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं छोटा भीमवर आधारित आहे. जो कायम खलनायकांपासून आपल्या मित्रांचं रक्षण करत असतो. तर या गाण्याचे संगीतकार सुनील कौशिक आहेत. हे प्रमोशनल गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कारण यातून छोटा भीम आणि त्याच्या मित्रांच्या मैत्रीतली ताकद अधोरेखित होते.

छोटा भीम हे आजच्या लहान पिढीचे आकर्षण आहे. मला या चित्रपटासाठी गाणं गायला मिळालं यातच मला खूप आनंद आहे. माझी ५ वर्षीय मुलगी रुबाब हीसुद्धा छोटा भीमची खूप मोठी चाहती आहे. ती सुद्धा या गाण्यामध्ये असल्यामुळे तिने या गाण्यासाठी केलेली तयारी यातून तिची एक वेगळी भूमिका दिसत आहे आणि ती या गाण्यावर चित्रित विडिओ मध्ये सुद्धा दिसणार आहे. वास्तविकरित्या एका फिचर फिल्ममधे अशाप्रकारे गाण्यावर चित्रित विडिओ हा आमचा पहिलाच प्रयोग आहे आणि हा प्रयोग यशस्वीरीत्या सुपरहिट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव चिलाका म्हणतात, या चित्रपटामध्ये दलेर मेहंदी यांनी गायलेलं गाणं यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत. या गाण्याची रेकॉर्डिंग संपली असून याचा म्युझिक विडिओ सुद्धा करण्याची योजना आम्ही करत आहोत. या गाण्यासाठी दलेर यांनी जबरदस्त काम केलं आहे आणि मला विश्वास आहे कि हे गाणं मुलांना खूपच आवडेल आणि ते याचा अनंद लुटतील.

‘छोटा भीम कुंफू धमाका’ या चित्रपटात भीम आणि त्याचे मित्र चीन मध्ये जगातील सर्वात मोठ्या कुंफू स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जातात. मात्र भीमला चीनच्या राजकुमारीला दुष्ट जुहूनपासून वाचवण्यासाठी बोलावलं गेल्यामुळे कशाप्रकारे त्या स्पर्धेत अडथळे निर्माण होतात याची कथा या चित्रपटात आहे.

राजीव चिलका आणि बिनायक दास दिग्दर्शित, ग्रीन गोल्ड अॅनिमेशन द्वारा निर्मित आणि यश राज द्वारा वितरित ‘छोटा भीम कुंफू धमाका’ हा चित्रपट १० मे २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2019 6:19 pm

Web Title: daughter of daler mehndi to feature in a punjabi song of chhota bheem kungfu dhamaka
Next Stories
1 सामाजिक भान जपणारे नाटक : ‘मी.. माझे.. मला’
2 ‘नो पार्किंग’मध्ये बाइक पार्क केल्याचा इशानला फटका, भरावा लागला दंड
3 ..म्हणून भारतात राहूनही आलिया भट्ट नाही करू शकणार मतदान
Just Now!
X