News Flash

…म्हणून दीपिकाने डिलीट केल्या सोशल मीडियावरील पोस्ट

सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यामागचं 'हे' होतं कारण; दीपिकाने केला खुलासा

"ज्यावेळी मी रणवीरला भेटले, त्यावेळी माझ्यात फार असा उत्साह नव्हता" असे दीपिकाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. अलिकडेच दीपिकाने तिच्या सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्यामुळे दीपिकाने अचानकपणे असा निर्णय का घेतला हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता दीपिकाने नव्या वर्षात एक खास पोस्ट शेअर करत पुन्हा चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे.

दीपिकाने नव्या वर्षात एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘माय ऑडिओ डायरी’ असं या व्हिडीओचं नाव असून त्यात दीपिकाने तिच्या मनातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. त्यातच नव्या वर्षाची नव्या उमेदीने सुरुवात करावी यासाठीच दीपिकाने तिच्या जुन्या पोस्ट डिलीट केल्याचं म्हटलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)


“हाय सर्वांना. माझ्या ‘माय ऑडिओ डायरी’मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मी माझे विचार आणि भावना मांडत आहे. मला खात्री आहे की २०२० हे वर्ष सगळ्यांसाठी थोड कठीण होते. माझ्यासाठी सुद्धा हे वर्ष काहीसं असंच गेलं. २०२१ हे वर्ष सगळ्यांना चांगलं जावो हीच मी प्रार्थना करते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा,” असं म्हणत दीपिकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, दीपिकाने नुकतचं शकुन बत्राच्या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी भूमिका साकारत आहेत. दीपिका आणि रणवीर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दोन दिवसांपूर्वी राजस्थानला गेले आहेत. त्यांच्या सोबत आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि नीतू कपूरदेखील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 2:53 pm

Web Title: deepika padukon shared her first post after deleting all post from her social media account dcp 98
Next Stories
1 Video : याची देही,याची डोळा… ; पाहा सई लोकूरचा लग्नसोहळा
2 ‘नव्या वर्षाचं स्वागत कसं करु?’ ; इरफानच्या पत्नीची भावूक पोस्ट
3 एका वर्षात कपिल शर्मा भरतो कोटयवधींचा टॅक्स; आकडा वाचून व्हाल थक्क
Just Now!
X