01 March 2021

News Flash

‘शाळेत असताना या किटकांना मारण्यासाठी आम्हा विद्यार्थांना बोलवायचे’ – धर्मेंद्र

धर्मेंद्र म्हणतायेत, या किटकांपासून सावध राहा

अॅक्शनस्टार धर्मेंद्र सध्या सिनेसृष्टीत सक्रिय नाहीत. परंतु ते सोशल मीडियावर मात्र कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या किटकांना पाहून धर्मेंद्र यांना आपल्या बालपणीचे दिवस आठवत आहेत.

“सावधान राहा या संकटाचा सामना आम्ही यापूर्वी केला आहे. जेव्हा मी १०वी मध्ये शिकत होतो तेव्हा या किटकांना मारण्यासाठी आम्हाला बोलावले होते. यांच्यापासून सुरक्षित राहा.” अशा आशयाचे ट्विट धर्मेंद्र यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये काही किटक दिसत आहेत.

धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणारे किटक सर्वसाधारणपणे शेतांमध्ये येतात. विशेषत: फळ बागांमध्ये घूसून हे किटक फळांची नासधूस करतात. यांना नियंत्रित करण्यासाठी फवारणी केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 3:04 pm

Web Title: dharmendra share video on locust attack in india mppg 94
Next Stories
1 अश्विनी भावे यांची गरजू रंगकर्मींसाठी लाखमोलाची मदत; प्रशांत दामलेंनी मानले आभार
2 ‘गुगल ट्रेण्ड’मध्येही सोनू सूद खरा हिरो; अक्षय कुमारला टाकलं मागे
3 “होय त्या स्टंटसाठी घडवला खरा विमान अपघात”; दिग्दर्शकानं दिलं स्पष्टीकरण
Just Now!
X