01 June 2020

News Flash

‘तेरा इमोशनल अत्याचार’ गाण्यामधील हा अभिनेता कोण आहे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल

२००९ साली प्रदर्शित झाला आहे 'देव डी' हा सिनेमा

'तेरा इमोशनल अत्याचार'

सोशल नेटवर्किंगवर कधी काय चर्चेत येईल सांगता येत नाही. सध्या सोशल नेटवर्किंगवर असाच एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे ‘देव डी’ हा सिनेमा. यामागील कारण म्हणजे या सिनेमातील लोकप्रिय ठरलेले आणि आजही आनेकांना आवडणारे गाणे ‘इमोश्नल अत्याचार.’

झालं असं की एका व्यक्तीने ‘देव डी’ या सिनेमामधील ‘तेरा इमोशनल अत्याचार’ या गाण्याचा फोटो शेअर केला. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘देव डी’  या सिनेमातील या गाण्यामध्ये दिसणाऱ्या दोन गायकांपैकी एकजण हा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहे असं या युझरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

अनेकांनी आपल्याला याबद्दल काहीच ठाऊक नव्हते असे मत नोंदवले. पहिल्यांदाच या गाण्यात दिसणारा अभिनेता हा नावजुद्दीन असल्याचे समजल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करु लागले अन् अचानक हे ट्विट चर्चेत आले.

दरम्यान अनेकांनी या ट्विटवर नवाजुद्दीनने सरफरोश आणि मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमामध्ये काम केल्याचेही सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 4:30 pm

Web Title: did you know nawazuddin siddiqui was in dev d iconic emotional attayachar song scsg 91
Next Stories
1 ‘जिओ’चे चार All IN ONE प्लॅन लाँच ; दररोज 2GB डेटा आणि कॉलिंग
2 Viral Video : दुसऱ्या मजल्यावरून कोसळलेलं मुल धावत्या रिक्षात पडलं
3 अबब… शस्त्रक्रिया करुन गायीच्या पोटातून काढले ५२ किलो प्लास्टिक
Just Now!
X